Home Remedies for Stomach Cleansing
|

पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आहारात वेगळ्या पदार्थाचा समावेश झाला तर त्यावेळी पोट  फुगण्याचे प्रमाण वाढते . तसेच पोट साफ न होण्याच्या समस्या या जास्त वाढीला लागतात. पोट साफ होण्यासाठी नेहमी आपल्या आहारात योग्य पदार्थ आणि खाण्याच्या सवयी या बदलल्या गेल्या पाहिजेत . जड अन्नपदार्थ हे पचनास जास्त वेळ लागतो. त्यामुळे पोटाच्या समस्या या जास्त वाढतात.

पोट साफ न होण्याची लक्षणे —

शौचास रोज न होणे व झाल्यास कडक होणे. पोट साफ न होणे. सौचसाठी खूप वेळ कुंठावे लागणे. त्यामुळे पोट दुखी वाढण्यास सुरुवात होते. पोट साफ न झाल्याने अस्वस्थता वाढते . आणि आरोग्याच्या इतर अनेक समस्या या निर्माण होतात .

पोट साफ होण्यासाठी काय खावे —

तांदूळ, लाह्या, मूग, दुधी, घोसाळी, दोडका, पालक, आंबट चुका, दूध, ताक, तूप, द्राक्षे, अंजीर, खजूर, आवळा, गरम पाणी, इत्यादी पदार्थ खावे याने आपल्या पोटाला आराम मिळेल.

पोट खराब असल्यास काय खाऊ नये —

हरबरा, मटार, चवळी, वाटाणा, पावटा, उडीद, बडीशेप, शेपू, शिंगाला, कॉफी, पोहे, शीतपेये इत्यादी पदार्थ खाऊ नये. याने पोट जड होते आणि मलावरोध चा त्रास होतो.

पोट साफ होण्यासाठी घरगुती उपचार —

— रात्री झोपताना अर्धा चमचा ओवा चावून खाल्ल्यास शौचास साफ होतो. त्यामुळे पोट दुखी सुद्धा कमी कमी होते .

— अर्धा ते एक चमचा एरंडेल रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याबरोबर प्यावे.

— जर पोट साफ होत नसेल तर त्यावेळी शिळे अन्न खाल्ले जाऊ नये.

— झोपताना गरम पाण्यात तुपाचा वापर करून पिले जावे .

— कोरफडीचा रस सुद्धा पोटाच्या समस्यांसाठी लाभकारी आहे.

— किंचित प्रमाणात कोरफड हि विस्तवावर शेकून त्याचा वापर हा पोटासाठी करावा.