home remedies for stomach fat
|

आपले पोट जर वाढले असेल तर त्यासाठी घरगुती उपाय

हॅलो आरोग्य  ऑनलाईनपुरुषांचे एका ठराविक वयानंतर पोट सुटण्यास सुरुवात होते. जर पोट खूप मोठ्या प्रमाणात सुटले जात असेल तर त्याच्यासाठी काही प्रमाणात घरगुती उपाय करणे आवश्यक आहे . त्यासाठी आपण आपल्या आहारात बदल करावे लागतील. यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना या केल्या जाव्यात यासाठी कोणत्या प्रकारचे आहारात बदल करावे लागतील.

— आहारात प्रथिनांचं प्रमाण वाढवावं, कारण प्रथिन शरीरात पटकन वापरली जातात.

— एकंदरीत आहार कमी करावा.

— साखरे ऐवजी गुळाची पावडर वापरू शकता.

— जेवणानंतर जर भूक लागली असेल तर, फळं खावीत.

— उकडलेल्या पालेभाज्या त्यात थोडं सैंधव मीठ टाकून खावं, बेस्ट..सगळ्यात उत्तम आहार आहे.

— पोळ्या किंवा चपाती, जे काही तुम्ही म्हणता ते, कमी जाडीच्या, आकाराने छोट्या असाव्यात.

— दररोज तीन ते चार लिटर पाणी प्यावे.

—- रात्रीचं जेवण संध्याकाळी सातलाच करावे.

— आठवड्यातून एकदा पोटाचा घेर सेंटीमीटर मधून मोजावा, दर आठवड्याला नोंद ठेवावी.

— दररोज नियमित पणे सकाळी व्यायाम हा केला जावा.