| |

सायनसच्या असहनीय त्रासापासून घरगुती उपाय देतील आराम; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या कपाळ, नाक आणि गालाच्या ठिकाणी काही पोकळ भाग असतात. त्या पोकळ भागांना सायनसेस असे म्हणतात. या सायनसेसमध्ये पातळ असा द्रव पदार्थ तयार होत असतो. यास श्लेष्मा (म्युकस) असे म्हणतात. अनेकदा काही कारणांमुळे सायनसमध्ये हा द्रवपदार्थ नाकावाटे बाहेर येतो. काहीवेळा सायनस भागात जास्त प्रमाणात म्यूकस जमा होतो आणि हा नाकावाटे वाहून न गेल्यास सायनसमधेच साठून राहतो. त्यामुळे साठून राहिलेल्या या म्यूकसमध्ये वायरस, फंगस किंवा बॅक्टेरियाचे इन्फेक्शन होते आणि परिणामी सायनसला सूज येते या स्थितीला सायनुसायटिस असे म्हणतात.

साइनसाइटस वा सायनसचं दुखणं असहनीय असतं. सायनसमध्ये अगदी जराशीही सर्दी, खोकला, तापदेखील मोठी समस्या होते. अॅलर्जी किंवा थंडीमुळे सायनसमध्ये सूज येते. यामुळे सायनसच्या रुग्णाला डोकेदुखी आणि अंगदुखीच्या वेदना होतात. या दुखण्यापासून सुटका होण्यासाठी अनेक रुग्ण काही औषधं घेतात. पण या समस्यांवर काही घरगुती उपाय अत्यंत लाभदायक आहेत. याच घरगुती उपायांची माहिती आज माही तुम्हाला देणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) मिठाच्या पाण्याचा वाफारा – सायनसच्या समस्येवर मिठाच्या पाण्याची वाफ घेणं फायदेशीर आहे. यामुळे बंद नाक मोकळं होत आणि सायनसच्या दुखण्यापासूनही आराम पडतो. यासाठी दिवसांतून २-३ वेळा हा उपाय करता येऊ शकतो.

२) लसूण – लसूण हे उष्ण गुणांचे असून यात अँटी – बॅक्टेरियल तत्व असतात. त्यामुळे लसणीच्या २-३ पाकळ्या चावून खा. यामुळे सायनसचा त्रास कमी होतो.

३) हळद – हळदीत पुरेशा प्रमाणात अॅन्टी-इंफ्लेमेटरी गुण असतात. यामुळे सायनस इन्फेक्शन कमी होतं. रस्ताही गरम पाण्यात हळद टाकून प्या.

४) सुंठ वेखंड लेप – यासाठी १/४ चमचा सुंठ व १/२ चमचा वेखंड पाण्यात भिजवून याची पेस्ट तयार करा. ह्याचा लेप कपाळ आणि नाकावर लावा. यामुळे सायनस डोकेदुखी कमी होते.

५) काळे जिरे – काळे जिरे हलके भाजून थोडे बारीक करून एका पातळ फडक्यात बांधा आणि त्याचा वास घेत रहा. असे केल्यास सायनसमुळे होणाऱ्या वेदना थांबण्यास मदत होते.

६) पुदिना – गरम पाण्यात पुदिन्याची पाने टाकून त्याची वाफ घेत रहा. यामुळे सायनसचा त्रास दूर होण्यास मदत होते.

७) कांदा लसणीच्या पाकळ्या – कांदा आणि लसणीच्या पाकळ्या बारीक करून पाण्यात उकळा. हे गरम पाणी एका भांड्यात किंवा ग्लासात घेऊन त्याची वाफ घ्या. यामुळे सायनसचा त्रास कमी होईल.

८) कांद्याचा रस – कांदा थोडा गरम करून त्याचा चमचाभर रस काढा आणि सायनसमुळे डोकेदुखी होत असल्यास नाकपुड्यामध्ये याचे २-२ थेंब टाका.

९) अॅप्पल साइड व्हिनेगर – अॅप्पल साइड व्हिनेगर इन्फेक्शनपासून बचाव करतं. म्हणून, सायनसची समस्या उद्भवल्यास, २ चमचे अॅप्पल साइड व्हिनेगरमध्ये १ चमचा मध मिसळून प्या. यामुळे सायनसपासून बचाव होतो.