Home remedies to reduce bile problems
|

पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करुन पहा

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  आपल्या आहारात जर जास्त पदार्थांचा समावेश झाला तर सुद्धा आपल्याला पचनाचा त्रास हा जास्त निर्माण होऊ शकतो. पित्त यांचे प्रमाण हे जास्त असेल तर डोकेदुखी याचे प्रमाण वाढते. पचनाच्या समस्यांमुळे तात्पुरती अस्वस्थता येते परंतु फार वेदनादायी नसल्याने कोणीही त्याकडे लक्ष देत नाही. जास्त प्रमाणात दुर्लक्ष केल्याने समस्या या जास्त प्रमाणात निर्माण होतात.

पित्ताच्या समस्या या जास्त प्रमाणात निर्माण झाल्या असल्यास —-

—- ओटीपोटात दुखणे सुरुवात होते तसेच छातीत जळजळ होण्याचे प्रमाण हे जास्त वाढते.

— पित्तामुळे मळमळ किंवा उलट्या होणे, असा त्रास जास्त होतो. पचन होत नाही.

—- पोटाच्या आतील भागाला सूज येणे; ओटीपोटचा घेर वाढणे या समस्या वाढायला सुरुवात होते.

— मोठ्या प्रमाणात जुलाबाचा त्रास वाढतो. तसेच बुद्धकोष्ठीता याच्या समस्या जास्त प्रमाणात निर्माण होतात.

— पित्तामुळे कोणत्याही प्रकारचे पदार्थ खावेसे वाटत नाही. त्यामुळे भूक हि जास्त लागत नाही.

—– आम्लपित्ताचा विकार उद्भवूच नये यासाठी प्रत्येकाने निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करणे आवश्यक आहे.

— त्यासाठी योग्य वेळी आहार घेणे गरजेचे आहे. आहाराच्या वेळा या पाळल्या गेल्या पाहिजेत.

—- जेवण करताना घाई घाईत जेवण करू नका.

— जेवणानंतर कमीतकमी अर्धा तास सरळ बसणे आवश्यक आहे.

—- एकाच वेळी भरमसाठ जेवण करण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने आहार घेणे गरजेचं आहे.

— पचनशक्ती व्यवस्थित ठेवण्यासाठी आहाराबरोबर व्यायामाची पण जोड असणे आवश्यक आहे.