| |

मुरुमांच्या डागांवर बदामाची क्रीम ठरेल सुपर मेडिसिन; जाणून घ्या बनवण्याची पद्धत

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल चुकीची जीवनशैली आणि चुकीचं खाणंपिणं यामुळे थेट आपल्या त्वचेवर याचा परिणाम दिसून येत असतो. जसे कि चेहरा ऑईली होणे. चेहऱ्यावर भरपूर पुटकुळ्या वा मुरूम येणे. मुरुमांचे डाग गडद होणे. यांपैकी मुरूम येणे आणि त्यांचे डाग गडद होणे या समस्या जास्त प्रमाणात अनेकांना भेडसावताना दिसत आहेत. मग काय? कित्येक लोक यासाठी बाजारात उपलब्ध असणारी महागडी सौंदर्य उत्पादने वापरतात आणि जर ते वापरून काहीही फरक पडला नाही तर यांचा चेहरा आणखीच हिरमुसून जातो. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हीही या मुरुमांच्या त्रासामुळे हैराण झाले असाल तर आता हिरमुसायची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला असा एक अव्वल घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याच्या सहाय्याने तुमचा चेहरा नुसता उजळणार नाही तर त्वचा कोमलसुद्धा होईल. यासाठी तुम्हाला बदामाचा वापर करायचा आहे. चला तर जाणून घेऊया कशी बनवाल ही सुपर केमिकल फ्री क्रीम खालीलप्रमाणे:-

बदाम स्कार रिमूवल क्रीम

० साहित्य
– बदाम २ बदाम
– दही २ चमचे दही
– चारकोल १ चमचा

० कृती – सर्वात आधी बदाम गॅसवर चांगले गरम करा. हे बदाम पूर्णपणे काळे करा. यानंतर, ते एका भांड्यात काढा. यानंतर बदाम बारीक वाटून घ्या. आता त्यात चारकोल घाला. हे दोन्ही पदार्थ एकत्र चांगले मिसळा. आता त्यात दही घाला. परत हे मिश्रण व्यवस्थित मिसळा. आता आपल्या चेहर्‍यावर मुरुमांच्या खुणा आहेत तिथे ही क्रीम लावा.

० वापर
– प्रथम आपला चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.
– आता मुरुमांच्या खुणा वा डाग असलेल्या भागावर ते लावा.
– साधारण १ ते २ तास हे असेच राहू द्या.
– पूढे २ तासानंतर ते पाण्याने धुवा.
– आपला चेहरा पूर्ण स्वच्छ करा.
– मऊ कापडाच्या सहाय्याने टॅप करीत चेहरा पुसा.

० फायदे
– या क्रीमचा वापर केल्यामुळे कोणतेही केमिकल चेहऱ्याचे नुकसान करत नाही.
– या क्रीममध्ये बदामाचा वापर केल्यामुळे चेहरा उजळण्यासाठी मदत होते.
– या क्रीममधील चारकोल चेहऱ्यावरील डागांवर प्रभावी काम करते.
– या क्रीममधील दही आपली त्वचा कोमल आणि मुलायम बनविण्यासाठी मदत करते.