| | |

कोणतेही दुष्परिणाम नसलेली होमिओपॅथी उपचार पद्धती आपल्यासाठी आहे फायदेशीर, ‘हे आहेत लाभकारक फायदे  

हॅलो आरोग्य ऑनलाईन । होमिओपॅथी डॉक्टर कडे गेल्यावर आपल्याला साबुदाण्यासारख्या गोड-गोड गोळ्या मिळतात. त्या गोड असल्यामुळे खाताना पण तोंड वाकडे होत नाही. पण आपणांस ठाऊक आहे का की, इतर डॉक्टर मोठ्यां, कडू आणि साइड इफेक्ट असणाऱ्या गोळ्या देत असताना हे डॉक्टर असे वेगळे उपचार का करत आहेत? होमिओपॅथी इतिहास मोठा रंजक आहे तो आज आपण जाणून घेऊयात.  साधारणपणे 225 वर्षांपूर्वी म्हणजेच 1796 साली जर्मनीमध्ये सॅम्युएल हॅनमन नावाच्या एका डॉक्टरने होमिओपॅथीचा शोध लावला. वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर त्यांना जाणवलं की आपण जे उपचार करत आहोत ती पद्धत कठोर, त्रासदायक आणि अपरिणामकारक आहे. या गोष्टीमुळे त्यांनी आपली प्रॅक्टिस सोडून दिली आणि ते भाषांतरकार बनले. पुढे पुस्तकं वाचता वाचता त्यांच्या हातात एक पुस्तक लागलं त्यात लिहिलं होतं की, झाडाच्या सालीपासून तयार करण्यात आलेल्या क्विनोन या औषधाने मलेरिया बरा होतो. या गोष्टीचं त्यांना कुतूहल वाटलं आणि ते यावर विचार करायला लागले. सॅम्युअल यांनी स्वतःवरच प्रयोग करायला सुरुवात केली. त्यांच्या हे लक्षात आलं की, जेव्हा ते क्विनोनचा डोस घेत होते तेव्हा त्यांच्या शरीरात मलेरियाची लक्षणं दिसू लागली होती.

मग यातूनच त्यांनी एक सिद्धांत मांडला आणि या विचारावरच होमिओपॅथी आज उभी आहे. या सिद्धांताला होमिओपॅथीमध्ये ‘like cures like’ असं म्हणतात. याचा अर्थ आहे काट्याने काटा काढणं. म्हणजे काय, तर ज्या तत्त्वापासून किंवा पदार्थापासून आजार तयार होतो, तेच तत्त्व औषध म्हणून वापरायचं. 1810 साली Dr.Samuel Hahnemann यांचे विद्यार्थी असलेल्या Dr. John Martin Honigberger या फ्रेंच प्रवाश्याने भारतात येऊन होमिओपॅथी उपचार केल्यामुळे हे सायन्स भारतात आले. 1839 साली जेव्हा ते दुस-यांदा भारतात आले तेव्हा त्यांनी पंजाबचे महाराजा रणजित सिंग यांच्या वोकल कॉर्डला झालेल्या अर्धांगवायूवर उपचार केले.  या औषधांमुळे महाराजांची प्रकृती सुधारली व महाराजांनी Dr.Samuel Hahnemann यांच्यावर खूष होऊन त्यांना राज्यांचे मुख्य फिजीशन म्हणून नियुक्त केले. महाराजांच्या मृत्यूनंतर Hahnemann कलकत्त्याला गेले व तिथे त्यांची प्रॅक्टीस करु लागले. अशा रितीने भारतात होमिओपॅथी उपचारांची सुरुवात झाली.

पण जर होमिओपॅथीची औषधं खूप मोठ्या प्रमाणात घेतली तर ती जीवघेणीसुद्धा ठरू शकतात असंही यपूर्वी तज्ज्ञांना आढळून आलंय आणि म्हणूनच औषध देण्यापूर्वी ते औषध डायलूट केलं जातं. यावरूनच होमिओपॅथी आणि अलोपॅथीदरम्यान वाद आहेत. कारण तज्ज्ञांच्या मते जर होमिओपॅथीचं औषध इतकं डायल्यूट केलं गेलं तर मग त्यात मूळ गोष्टी फारच कमी प्रमाणात राहातात.

निरनिराळ्या व्यक्तीनूसार उपचार – होमिओपॅथी उपचार प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्रपणे करण्यात येतात तसेच जरी त्यातील औषधी घटक हे समान असले तरी त्याचा प्रत्येक व्यक्तीवर होणारा परिणाम देखील निरनिराळा असू शकतो. होमिओपॅथी उपचारांमध्ये फक्त विकाराची लक्षणेच तपासली जात नाहीत तर यासाठी रुग्णाची शारीरिक स्थिती,स्वभाव,व्यक्तीमत्व व इतर अनुवंशिक घटक यांचा देखील अभ्यास करण्यात येतो. होमिओपॅथी मध्ये ‘like cures like’ या तत्वाचा वापर करण्यात येतो. म्हणजे जे घटक निरोगी माणसाला आजारी पाडण्यासाठी कारणीभूत असतात त्याच घटकांचा आजार बरे करण्यासाठी वापर करण्यात येतो. दुसरीकडे अॅलोपॅथिक औषधांमध्ये Pharmacological Agents अथवा Physical Interventions जसे की शस्त्रक्रिया, उपचार अथवा विकाराची लक्षणे कमी करण्यावर भर देण्यात येतो.

डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीनं सेवन केल्यास होमिओपॅथी औषधांचे कुठलेही साईड इफेक्ट्स होत नाहीत. त्यामुळे रुग्णांसाठी हे महत्वाचं ठरतं. होमिओपॅथीचे उपचार व्यवस्थित घेतल्यास आजाराचं समूळ उच्चाटन होतं, ताप्तुरता उपचार होमिओपॅथीत नाही. तेव्हा होमिओपॅथीचे उपचार घेताना संयम ठेवणे, फरक लक्षात घेणे महत्वाचे आहे. होमिओपॅथीचा कोणताही साईड इफेक्ट नाही.

होमिओपॅथीचं औषध हे साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या गोळ्यांवर टाकून रूग्णांना दिलं जातं. मात्र होमिओपॅथीकडे रुग्ण आकर्षित होण्यामागे अनेक कारणं आहेत. डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीनं सेवन केल्यास होमिओपॅथी औषधांचे कुठलेही साईड इफेक्ट्स होत नाहीत. त्यामुळे रुग्णांसाठी हे महत्वाचं ठरतं. वेदनाशामक औषधांचं व्यसन लागल्याच्या अनेक घटना समोर येतात. मात्र होमिओपॅथी औषधांच्या बाबतीत हा धोका नसतो. उपचाराने आराम मिळाल्यावर रूग्ण औषधांच्या आहारी जात नाही. औषध सेवन करताना गरोदर महिलांनी काळजी घेणं गरजेचं असतं. कुठल्याही औषधाचं सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो. याशिवाय, काही औषध गरोदरपणात घ्यायला मनाई असते. मात्र होमिओपॅथीचे उपचार गरोदरपणातही केले जाऊ शकतात.

होमिओपॅथीनं लहान मुलं तसंच, नवजात बालकांवरदेखील सुरक्षितपणे उपचार केले जाऊ शकतात. लहान मुलांना औषधं देणं जिकरीचं काम असतं. त्यांच्या वयाला अनुसरुन औषधांचे डोस देणं गरजेचं असतं. नवजात बालकांनाही हे लागू होतं. इतर औषधांचं सेवन करताना ही काळजी घेणं गरजेचं असतं.