| |

गर्भातील बाळासाठी अननस खाणे पोषक आहे का?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अननस हे असे फळ आहे जे बाहेरून कितीही काटेरी वाटले तरीही चवीला आंबट गोड असते. त्यामुळे अनेकांना अननस खायला फार आवडतो. प्रामुख्याने पक्क अननसाच्या चकत्या करून खाल्ल्या जातात. शिवाय या फळापासून मुरंबा, रस व शिर्का तयार करतात. अनेकजण गरोदर स्त्रियांना अननस खाण्याचा सल्ला देतात. पण गरोदरपणात स्त्रीने स्वतःची आणि आपल्या गर्भाची काळजी घेणे हि तिची प्रथम जबाबदारी असते. त्यामुळे अनेकदा अननस खावा कि नाही याबाबत मोठा प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हालाया प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.

गरोदरपणात अनेक गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे असते. यातील काही गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्याच्या असतात आणि काही ऐकलेल्या असतात. गरोदरपणात अननस खाण्याबाबतही असेच काही आहे, लोकांचा असा विश्वास आहे की या काळात अननस खाऊ नये. पण अननस खाऊ नये असा कोणताही नियम नाही. शिवाय अननसात अनेक पौष्टिक घटक असतात जे गर्भवती महिला आणि त्यांच्या गर्भासाठी अतिशय उत्तम असते. त्यामुळे अननस न खाण्याबाबतच्या शंका मनातून काढून टाका. मात्र तरीही तुमच्या मनात शंका आली किंवा तुम्हाला अननस आवडत नसेल तर यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अननसाच्या त्याच्या ताज्या रसात ब्रोमेलिन नावाचा पाचक पदार्थ असतो. तसेच यात क जीवनसत्त्वही असते. अननसाचे पिकलेले फळ शीतल, पाचक व मूत्रल असते. शिवाय आंबटगोड अननस मॅंगॅनीजचा उत्तम स्रोत आहे. यामुळे गर्भारपणात अननस खाणे धोक्याचे नाही तर हिताचे आहे.

० अननसात आढळणारे पौष्टिक घटक आणि त्यांचे फायदे :-

१) अननसात व्हिटॅमिन बी 1 असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे

२) अननसात व्हिटॅमिन बी 6 हा घटक देखील असतो. जो शरीराच्या अनेक कार्यांमध्ये ऊर्जा देतो आणि अशक्तपणावर मात करतो.

३) तर अननसात आढळणारा व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास सक्षम आहे.

४) अननसातील तांबे आपले केस आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे

५) निरोगी हाडांसाठी अननसात असणारे मॅंगनीज अत्यंत सहाय्यक ठरते.