| | |

हिंग खाण्याआधी ते बनावट तर नाही ना हे कसे ओळखालं?; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। भारतीय स्वयंपाकाघरात हिंगाची डबी म्हणजे अगदीच सर्वसाधारण बाब आहे. कारण हिंग निरनिराळ्या भाज्या, डाळी, खिचडीच्या फोडणीसाठी वापरल्याने त्याचा सुवास आणि चव अतिशय सुंदर उतरते. हिंगाच्या फोडणीचा खमंग वास भुक चाळवतो. कारण हिंगामुळे पदार्थाला विशिष्ठ अशी चव येते. हिंग जेवणात वापरणे याचे खूप मोठे आहारशास्त्र आहे. कारण हिंगामुळे त्या पदार्थांची चव आणि पोषणमुल्य दोन्ही एकत्र वाढतात. शिवाय हिंग वापरल्यामुळे अनेक विकार दूर राहतात.

मुळात हिंग खाण्याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे असल्यामुळे त्याचा वापर शरीरोपयोगी आहे. आपण खाल्लेल्या अन्नपदार्थांचे योग्यरित्या पचन होण्यासाठी पारंपरिक स्वयंपाकात हिंगाचा आवर्जून वापर केला जातो. मात्र जर आपल्या रोजच्या खाण्यात बनावट हिंग असेल आणि ते आपल्या लक्षात आले नाही तर याचा थेट आपल्या शरीरातील पचन प्रक्रियेवर परिणाम होत असतो. अश्या हिंगाचे सेवन केल्याने अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच आम्ही तुम्हाला हिंग बनावट आहे का अस्सल आहे हे ओळखण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० अस्सल हिंग कसे ओळखालं ?

१) अस्सल हिंगाचा रंग हलका पिवळसर असतो. मात्र तुमच्याकडे असणारे हिंग काळपट, पांढरे, मातकट रंगाचे असेल तर ते बनावट आहे समजावं.

२) तुपात हिंग टाकल्यावर हिंग फुलते व त्याचा रंग वेगाने लाल होतो. मात्र असे झाले नाही म्हणजे हिंग बनावट आहे हे नक्की.

३) अस्सल हिंग पाण्यात घातल्यावर पाण्याचा रंग पांढरा होतो. त्यामुळे हा प्रयोग केल्यास असे झाले नाही तर समजावे आपल्याकडील हिंग भेसळयुक्त आहे.

४) अस्सल हिंग जाळल्यावर त्यातून चमकदार द्रव निघतो आणि तो लगेच जळतो. परंतु बनावट किंवा भेसळयुक्त हिंगाच्या बाबतीत असे काहीही होत नाही.

५) अस्सल हिंगाला हात लावल्यानंतर हात कितीही साबणाने धुतले तरीही हिंगाचा वास काही जात नाही. परंतु हिंग बनावट असेल तर हाताचा वास लगेच जातो.