| | |

कोरोनामुक्त झाल्यानंतर वास घेण्याची क्षमता परत कशी मिळवालं? लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दरम्यान कोरोना संक्रमणानंतर अनेक रुग्ण त्यातून बरेदेखील होत आहेत. परंतु त्यांची वास घेण्याची शक्ती काहीशी पूर्ववत झालेली नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची काही दिवसांनी वास घेण्याची क्षमता पूर्ववत होईल. परंतु बर्‍याच लोकांना ६ महिन्यांनंतरसुद्धा त्यांनी गमावलेली वास घेण्याची क्षमता पुन्हा मिळवता आलेली नाही आणि हि बाब अत्यंत चिंताजनक आहे. याकरिता आधी हे जाणून घेऊया कि हि क्षमता नाहीशी का होते आणि त्यानंतर काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जे सोप्पे आणि घरगुती आहेत. त्यांच्या मदतीने तुम्ही गमावलेली वास घेण्याची क्षमता पुन्हा मिळवू शकाल.

  • वास घेण्याची क्षमता का जाते?
    – आपल्या नाकातील ओल्फक्टरी हे नर्व्हस सोबत जुळलेले असते. हे असे साधन आहे ज्याद्वारे कोणत्याही वासाची माहिती मेंदूत प्रथम प्रसारित होते. मात्र कोरोनाच्या संक्रमणामुळे ओलफक्टरी नर्व्ह आणि मेंदूचे हे संबंध तुटतात आणि याचमुळे आपली वास घेण्याची क्षमता नाहीशी होते.
  • वास घेण्याची क्षमता परत मिळविण्यासाठीचे उपाय :-

१) व्हिटॅमिन – ए आणि अल्फा लिपोइक ऍसिड समाविष्ट असलेल्या पदार्थांचे सेवन करणे. जसे कि साधा तांदूळ, ब्रोकोली, मासे, दूध, गाजर, पालक, टोमॅटो, बीट, पपई आणि दही. या पदार्थांचे सेवन केल्याने जिभेची चव घेण्याची आणि नाकाची वास घेण्याची शक्ती दोन्ही परत मिळतात.

२) ज्या पदार्थांचा वास अतिशय तीव्र किंवा तीक्ष्ण असतो त्यांचा वास घेणे. उदा. पुदीना, लवंग, निलगिरी, जायफळ, परफ्यूम, लिंबाची साल. या पदार्थांचा वास घेतल्याने ओल्फक्टरी नर्व्ह पुन्हा सक्रिय होतात.

३) वास घेण्याची क्षमता परत मिळविण्यासाठी आंबट फळांचा वास घेणे आणि त्यांचे सेवन करणे फायद्याचे ठरू शकते. शास्त्रज्ञांच्या मते, हे नियमित केल्याने आपली वास घेण्याची क्षमता पुन्हा आपण मिळवू शकतो.

४) योगाभ्यास करणे वास घेण्याची शक्ती परत आणण्यासाठी, दररोज किमान १५ मिनिटे अनुलोम – विलोम यांचा योगाभ्यास करणे अतिशय लाभदायक ठरते.