| | |

मधुमेहींनो वाढत्या वजनावर नियंत्रण कसे ठेवालं?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। ‘मधुमेह’ हा एक असा आजार आहे जो संबंधित रुग्णाला हळूहळू आतून पोखरतो. त्यामुळे मधुमेहींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे नेहमीच गरजेचे असते. प्रामुख्याने मधुमेहींच्या आहाराकडे खूप लक्ष द्यावे लागते. म्हणून जेव्हा वजन कमी करण्याचा वा वजनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रश्न येतो तेव्हा मधुमेही थोडे का होईना गडबडतात. कारण खराब आहारामुळे मधुमेहाच्या रुग्णांची तब्येत बिघडू शकते. खरंतर, वजन वाढणे हा मधुमेह प्रकार २ चे प्रमुख लक्षण आहे. हि स्थिती इन्सुलिन थेरपीमुळे होते. शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी ग्लुकोज शोषून घेण्यास जबाबदार असलेले इन्सुलिन, प्रक्रियेदरम्यान अन्नातून खूप जास्त साखर शोषून घेते. त्यामुळॆ शरीर त्याचे चरबीत रूपांतर करताना शरीरात अतिरिक्त चरबी जमा झाल्यामुळे वजन वाढते. म्हणून मधुमेहींना आपल्या खाण्यापिण्याच्या पदार्थांबाबत सतर्क राहणे अतिशय गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊयात डाएट टिप्स. ज्या मधुमेहींचे वजन कंट्रोल करण्यासाठी मदत करेल.

– कमी ऊर्जा आहार म्हणजे काय?

* अभ्यासानुसार, मधुमेह प्रकार २ रुग्णांचे निदान करण्यासाठी कमी ऊर्जा असलेल्या आहाराचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनात करा. जेव्हा वजन कमी करणे आणि मधुमेहाचे व्यवस्थापन करणे असा प्रश्न असतो तेव्हा अत्यंत कमी ऊर्जा असलेला आहार घेणे प्रभावी आहे.
* कमी ऊर्जा आहार म्हणजे असा आहार ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीने दररोज ८०० कॅलरीपेक्षा कमी खाणे.
* कमी उर्जा आहार मधुमेहींसाठी जास्त फायदेशीर आहे. वजन वाढल्यास ते कमी करण्यासाठी किमान १२ आठवडे कमी- ऊर्जायुक्त आहार घेणे आणि त्यानंतर कमी चरबीयुक्त, उच्च-कार्बोहायड्रेट आहार मधुमेह प्रकार २ च्या रुग्णांनी घ्यावा.
* हे डाएट सामान्यतः ८ ते १६ आठवडे पाळले जाते. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला दर आठवड्याला दीड ते अडीज किलो वजन कमी करण्यास मदत होते.

– कसा आहे कमी ऊर्जेचा आहार?
* दिवसातून ३ वेळा कमी ऊर्जेचा आहार आणि पाणी प्रभावी उपाय आहे.
* या डाईटमध्ये पिष्टमय पदार्थ नसलेल्या, रंगीबेरंगी भाज्या आणि चांगल्या दर्जाची प्रथिने असतात.
* तसेच दररोज किमान २ लिटर पाणी पिणे यात महत्त्वाचे आहे.
* हा आहार करताना बद्धकोष्ठता टाळण्यासाठी हलका व्यायाम करा.
* अरबट चरबट स्नॅक्स आणि अल्कोहोलचे सेवन टाळल्यास दैनंदिन ऊर्जा सेवनाचे प्रमाण वाढते.

– महत्वाचे
* या आहारामुळे कधी कधी गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात आणि काही आरोग्याची काही तक्रारी जाणवू शकतात. त्यामुळे या आहाराचे अनुसरण करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
* वैद्यकीय तपासणीनंतरच असा आहार घ्या.
* शिवाय वजन थोडे कमी करण्यासाठी हा आहार चांगला आहे. मात्र दीर्घकाळ हेच डाएट पाळल्याने अशक्तपणा, बद्धकोष्ठता आणि श्वासाची दुर्गंधी यांसारख्या समस्या उद्भवतात.