|

बटाट्याचा गोडवा कसा दूर कराल?; जाणून घ्या टिप्स

हॅलो आरोग्य ऑनलाईन। बटाटा एक अशी भाजी आहे जी बहुतांश लोक आवडीने खातात. कारण बटाटा प्रत्येक भाजीसोबत समरस होतो आणि खायलाही चविष्ट लागतो. पण आजकाल बाजारात उपलब्ध होणारे बटाटे वाकड्या तिकड्या आकाराचे आणि चवीला बऱ्याचदा गोड असतात. हे बटाटे खाताना गॉड लागल्यामुळे भाजीची चव बदलून जाते. यामुळे बटाटे खाताना लोक विचार करतात. कारण बटाटा चवीला गोड नसतो आणि गोड बटाट्यामुळे तिखट आणि चमचमीत भाज्यांची चव आणि त्यासोबत रंग दोन्ही बदलतात. याशिवाय बटाट्यातील गुणधर्मांमध्येदेखील बदल होतो.

बटाटे अनेक पौष्टिक तत्त्वांनी भरलेले असतात. बटाट्यात जास्त प्रमाणात स्टॉर्च असते. बटाटे क्षारीय असतात. यामुळे बटाटे खाल्ल्याने शरीरातील क्षारांचे प्रमाण संतुलित राहते. बटाट्यामध्ये सोडा, पोटाश आणि व्हिटॅमिन ए आणि डी परिपुर्ण प्रमाणात असते. यामुळे बटाटा नेहमी सालासोबत शिजवून खाल्ला पाहीजे. पण बटाटा गोड असेल तर अनेकदा यातील सर्वात पौष्टिक भाग त्याच्या सालाच्या खालील भाग एक विशिष्ट प्रकारचा पांढरा द्रव पदार्थ सोडतो जो मधुमेहींच्या आरोग्यासाठी लाभदायक नसतो. यामुळे गोड बटाटे खाणे काही अंशी आरोग्यासाठी लाभदायक नाहीत. त्यामुळे मधुमेहींनी बटाटा खाणे टाळणेच योग्य राहील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बटाट्याचा गोडवा कमी करण्यासाठी टिप्स देणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) सर्व प्रथम बटाट्यांचा आकार सारखाच आहे की नाही हे तपासा.
– नसल्यास, बटाटे क्रमवारी लावा.
– सर्व बटाटे धुवून घ्या. एका मोठ्या भांड्यात मीठ, २ ते ३ चमचे व्हिनेगर पाण्यात टाका आणि त्यात बटाटे साधारण १ ते २ तास सोडा.
– यानंतर हे बटाटे पाण्यातून काढून कोरडे करा. असे केल्याने बटाट्याचा गोडवा बर्‍याच प्रमाणात कमी होईल.

२) भाजी बनवण्यापूर्वी,
– बटाट्याचे तुकडे करून घ्या.
– एका भांड्यात २ ते ३ चमचे खाण्याचा सोडा आणि पाणी मिसळा. त्यात बटाटे टाका आणि १५ ते २० मिनिटे ठेवा.
– निर्धारित वेळेनंतर बटाट्याचे तुकडे स्वच्छ पाण्याने धुवावेत. अशा प्रकारे बटाट्याचा गोडवा कमी करता येतो.

३) बटाट्याचा रस्सा बनवण्यापूर्वी,
– बटाटे स्वच्छ धुवून सोलून घ्या.
– यानंतर बातात्याचे लहान तुकडे करा.
– हे तुकडे ३० मिनिटे खारट पाण्यात सोडा. त्यानंतर भाज्यांमध्ये वापरा.

४) जर तुम्हाला खारट पाण्यात घालायचे नसेल तर या बटाट्यापासून आंबट रस्सा भाजी करा. यासाठी,
– बटाट्याच्या करीमध्ये दही, टोमॅटो, लिंबाचा रस घाला.

५) बटाट्यापासून दही वा मठ्ठा बटाटा दही बनवू शकता.

६) याशिवाय गॉड बटाट्यांना तळून कुरकुरीत बनवू शकता. तसेच या बटाट्यापासून चिप्स बनवता येतात. जे चवीला उत्कृष्ट लागतील.