| |

शरीरात आयर्नची कमतरता आहे हे कसे ओळखालं?; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। निरोगी आरोग्यासाठी आपल्या शरीरास आवश्यक असणारी सर्व पोषक तत्त्व आणि घटक गरजेनुसार मिळणे आवश्यक आहे. या तत्त्वांपैकी एकाची जरी मात्रा कमी झाली तरी आपल्या शरीराला इतर आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकदा या घटकांची मात्रा घटल्याचे आपल्या लक्षात न आल्याने गंभीर आजार होण्याची शक्यता बळावते. यातील आयर्नच्या कमतरतेमूळे शारीरिक दुर्बलता जाणवते. इतकेच नव्हे तर आयर्नची कमतरता आपल्या रोग प्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम करते. यामुळे रोग प्रतिकार शक्ती कमजोर होते. आयर्नच्या कमतरतेने शरीरात अनेक प्रकारचे आजार घर करू लागतात. म्हणून आज आपण शरीरातील आयर्नच्या कमतरतेची लक्षणे आणि उपाय जाणून घेणार आहोत.

  • शरीरातील आयर्नच्या कमतरतेची लक्षणे कोणती?

– शरीरात आयर्नची मात्रा गरजेपेक्षा कमी झाल्यास रेड ब्लड सेल्स कमी तयार होतात.

– शरीरात आयर्नची कमतरता असल्यास सुरुवातीला शारीरिक थकवा, डोकेदुखी आणि चक्कर यांसारख्या समस्या उदभवतात.

– आयर्नच्या कमतरतेमुळे श्वास घेण्यास त्रास आणि मानसिक अस्वस्थता जाणवते.

– आयर्नची कमतरता असल्याने केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. परिणामी केस गळण्याची समस्या होऊ लागते.

– विनाकारण चिडचिडपणा आणि त्वचेचा रंग अचानक पांढरा पडू लागणे हे देखील आयर्नच्या कमतरतेची लक्षणे आहेत.

– आयर्नची कमतरता त्वचेतील कोरडेपणा आणि नखे सफेद होण्यामागचे कारण असते.

  • आयर्नच्या कमतरतेमुळे कोणते दुष्परिणाम होतात?

१) महिलांना मासिक पाळीदरम्यान त्रास संभवतात. तर गर्भारपणात शारीरिक थकवा येतो.

२) रक्तातील तांबड्या पेशींची कमतरता होते. परिणामी हिमोग्लोबिन कमी झाल्याने इतर आजारांचा धोका वाढतो.

३) सर्व पेशी आणि मसल्सपर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सीजन पोहचत नाही. यामुळे हृदयाचे आरोग्य धोक्यात येते.

  • शरीरातील आयर्नच्या कमतरतेवर करावयाचे उपाय –

१) शरीरात आयर्नची कमतरता जाणवल्यास सर्वात आधी रोजच्या खाण्या – पिण्याच्या सवयीनमध्ये बदल करावा आणि आयर्नयुक्त पदार्थांचे सेवन करावे. शाकाहारी लोकांनी आहारात काळे तिळ, खजूर, व्हीट ग्रास, मोरिंगा (शेवगा पाने), मनूके, बीट, गाजर आणि शेवग्याची शेंग यांचे सेवन करावे. तर मांसाहारी लोकांनी आहारात मटण, मासे आणि अंडे यांचे सेवन करावेत.

२) आहारात प्रामुख्याने ताज्या हिरव्या पालेभाज्या आणि फळे यांचा समावेश करावा.

३) आपल्या शरीराने आपण खात असलेल्या अन्न पदार्थांमधील आयर्न योग्यरीत्या शोषून घेण्यासाठी ‘व्हिटॅमिन सी’युक्त पदार्थांचे सेवन करावे.