| |

शरीरात प्रोटीनची कमतरता आहे हे कसे माहित कराल..?; जाणून घ्या प्रमुख लक्षणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। निरोगी आयुष्यासाठी आपल्या शरीरातील प्रोटीनची मात्रा योग्य असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण जर आपल्या पुरेसे प्रोटीन नसेल तर आपल्याला अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल. आपल्या शरीराला पूर्ण धान्य, नट्स, आणि सोयाबिनसारख्या पदार्थांमधून प्रोटीन मिळत असते. मात्र अनेकजण हे पदार्थ आहारात घेणे टाळतात. यामुळे शरीराला गरजेइतके प्रोटीन मिळत नाही आणि आपले शरीर कमकुवत होते. राहिला प्रश्न आपल्या शरीरात प्रोटीनची कमतरता आहे का नाही हे जाणून घेण्याचा, तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत शरीरात प्रोटीनची कमतरता असल्यास कोणती लक्षणे प्रामुख्याने आढळतात आणि हि लक्षणे आढळ्यास कोणत्या पदार्थांचा आहारात लगेच समावेश केल्याने प्रोटीनचे प्रमाण संतुलित राहते.

* प्रमुख लक्षणे

१) भुकेमध्ये वाढ – प्रोटीन हे शरीरासाठी सर्वात महत्वाचे इंधन आहे. त्यामुळे जर आपल्या शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर आपल्याला साधारणपणे जास्त भूक लागते आणि मुख्य म्हणजे जंक फूड खाण्याची जास्त इच्छा होते. परिणामी वजन वाढते आणि लठ्ठपणा येतो. यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

२) कमकुवत केस – जर आपल्या शरीरास पुरेसे प्रोटीन प्राप्त होत नसेल तर याचा परिणाम आपल्या केसांवर होतो. यामुळे केसांना फाटे फुटणे, केस गळणे आणि टक्कल पडणे यांसारख्या समस्या उदभवतात व सौंदर्यावर गदा येते.

३) कमकुवत नखे – आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे प्रोटीन योग्य प्रमाणात आपल्या शरीरास प्राप्त होत नसेल तर याचा परिणाम आपल्या नखांवरही दिसतो. परिणामी नखं तुटणे, नखं वाकणे किंवा नखं खाण्याची ईच्छा होणे अश्या समस्यांना सामोरे जावे लागते.

४) पोटऱ्या दुखणे – शरीरातील प्रोटीनच्या कमतरतेमुळे पायाच्या पोटऱ्या जड होतात किंवा चालतेवेळी पायांत कळ जाते व स्नायू दुखावतात.

५) कमी वयात सुरकुत्या येणे – आपल्या त्वचेला पुरेसे प्रोटीन न मिळाल्याने आपली त्वचा मऊ होते व गळू लागते. परिणामी कमी वयात सुरकुत्या येण्यास सुरूवात होते. यामुळे वयाआधीच आपण वृद्ध दिसू लागतो.

* लक्षणे आढळल्यास त्वरित या पदार्थांचा आहारात समावेश करा. खालीलप्रमाणे:-

१) शेंगदाणे –  शेंगदाणा हा प्रोटीनचा उत्तम व नैसर्गिक स्रोत आहेत. मुख्य म्हणजे केवळ १०० ग्रॅम शेंगदाणे शरीराला २६ ग्रॅम इतके प्रोटीन देऊ शकतात.

२) काळे चणे – काळे चणे अर्थात ‘बंगाल ग्राम’ देखील प्रोटीनयुक्त पदार्थ आहे. यातील १०० ग्रॅम चाण्यांमध्ये १९ ग्रॅम प्रोटीन असते.

३) दूध – दूध देखील प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. मुख्य २५० मिली दुधामध्ये (१ग्लास दूध) ६.८ ग्रॅम प्रोटीन असते.

४) अंडी – शरीरातील प्रोटीनची मात्र संतुलित करण्यासाठी दिवसातून केवळ २ अंडी खाणे देखील फायदेशीर असते. सर्व साधारणपणे ५० ग्रॅम अंड्यामध्ये (१ मोठे अंड) ६ ग्रॅम इतके प्रोटीन असते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *