|

आपले आरोग्य निरोगी आहे हे कसे ओळखालं?; जाणून घ्या 3 सोप्प्या पद्धती

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकालची जीवनपद्धती पाहता निरोगी राहणे अगदीच कठीण टास्क वाटू लागला आहे. प्रत्येक एका व्यक्तीमागे एकाला कोणत्या ना कोणत्या आजाराची लागण हि असतेच. यामुळे आरोग्यासह जीवनमानाचा ऱ्हास होऊ लागला आहे. अनेकदा काही आजार जडताना आपले शरीर आपल्याला संकेत देत असते हे लक्षात घेणे जरुरी आहे. यासाठी शरीराची नियमित तपासणी आवश्यक आहे. पण रोजची धावपळ पाहता अनेकांना शरीराची नियमित तपासणी करणे शक्य होत नाही. परंतु वर्षात एकदा तर शरीराचे मॉनिटरिंग करण्याने आपल्याला वेळीच गंभीर आजाराचे निदान वेळीच समजू शकते. यामुळे योग्य वेळी उपचार घेता येतात. परंतु तुम्हाला जर हे शक्य नसेल तर घाबरायची गरज नाही. तुम्ही अगदी घरबसल्या ३० सेकंदामध्ये आपल्या शरीअरची आरोग्य तपासणी करू शकता. जाणून घ्या या सोप्प्या पद्धती खालीलप्रमाणे:-

० चाचणी क्रमांक १
– सर्वात आधी आपल्या दोन्ही हातांची बोटे तळव्यात दाबून घट्ट मुठ बनवा.
– आपल्या हातांना सुमारे ३० सेकंदापर्यंत या स्थितीत ठेवा.
– यानंतर जेव्हा तुम्ही हात उघडाल तेव्हा हात थोडे सफेद पडल्याचे दिसून येईल.

कारण व निदान – हात सफेद पडणे म्हणजे शरीरात ब्लड फ्लो कमी झाला आहे. यानंतर हातांचा रंग किती वेळाने पहिल्याप्रमाणे सामान्य होत आहे याकडे लक्ष द्या. यामध्ये हात थोडे सुन्न होऊ शकतात. याशिवाय तळव्यांपर्यंत रक्त पोहचण्यास उशीर लागू शकतो. हा ‘आर्टेरिया सोरोसिस’चा संकेत असण्याची शक्यता आहे.

० चाचणी क्रमांक २
– यामध्ये नखाच्या मुळाला ५ सेकंदपर्यंत दाबून ठेवा.
– यानंतर नख दाबून सोडले असता ते काही काळासाठी सफेद पडते.

कारण व निदान – बोटांमध्ये ब्लड फ्लो चे प्रमाण वेगवेगळे असते. मात्र दाब दिलेल्या नखात ब्लड फ्लो परत येण्यास ३ सेकंदपेक्षा जास्त वेळ लागल्यास विविध आजार असण्याची शक्यता आहे. जर अंगठ्यात वेदना जाणवली तर ‘रेस्पिरेटरी’संबंधी समस्येचा संकेत समजावा.
यामध्ये,
– इंडेक्स फिंगर म्हणजे अंगठ्याच्या शेजारील बोट मोठे आतडे वा पचनप्रणाली खराब असल्याचे संकेत देते.

– मीडल आणि रिंग फिंगर कार्डियोव्हॅस्क्यूलर आजाराकडे इशारा करते.

– तर हाताच्या सर्वात छोट्या बोटात छोट्या आतड्यातील खराबी समस्या दर्शविली जाते.

० चाचणी क्रमांक ३
– यासाठी जमीनीवर तोंडाच्या बळावर सरळ झोपा.
– आता आपले हात शरीराच्या रेषेत सरळ आणा.
– सोबत दोन्ही पाय हळुहळु उचला.
– या स्थितीमध्ये शरीर सुमारे ३० सेकंद ठेवण्याचा प्रयत्न करा.

निदान – जर असे करण्यात तुम्हाला अडचण आली तर कण्याच्या खालील भागाशी वा पोटाशी संबंधित कोणतीही समस्या किंवा आजार असण्याची शक्यता असू शकते.