|

आपले यकृत आजारी आहे कसे ओळखालं?; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। ‘यकृत’ हा आपल्या शरीराचा एक अत्यंत महत्वाचा आंतर भाग आहे. सोप्प्या भाषेत सांगायचे झालेच तर यकृताला शरीराचे इंजिन म्हणतात. कारण जर एखाद्या व्यक्तीचे यकृत खराब झाले अर्थात आजारी पडले तर त्याच्या शरीरात एकाच वेळी अनेको रोग आपले स्थान निर्माण करण्यास सक्षम होतात. यकृत पोटाशी संबंधित असलेला अवयव आहे. आपल्या पोटाशी संबंधित कोणतीही समस्या वारंवार जाणवत असेल तर आपण हे वेळीच समजून जाणे आवश्यकी आहे कि आपल्या यकृतामध्ये काही ना काही बिघाड आहे. त्यातील गैरप्रकारांमध्ये फॅटी यकृत, सूज आणि यकृत संसर्ग अश्या समस्यांचा समावेश होतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत यकृत आजारी असण्याची लक्षणे कोणती आणि त्यावर उपाय काय? खालीलप्रमाणे:-

० लक्षणे
१) तोंडातून दुर्गंध येणे

२) पोटदुखी/ पोटात एकाच बाजूस दुखणे/ कळा जाणे

३) जेवण व्यवस्थित पचत नाही/ अपचनाचा त्रास

४) डोळ्यांमध्ये गडद रंगाचे डाग

५) त्वचेवर पांढरे चट्टे वा डाग

६) लघवी गडद होणे/ जळजळ वाटणे

७) मल उत्सर्जनास अडचण

० घरगुती उपचार

१) पपई आणि लिंबू – पपई हे पोटातील प्रत्येक आजार दूर करण्यासाठी उपयुक्त असे फळ आहे. यकृत संबंधित काही समस्या आढळल्यास दररोज १/२ चमचा लिंबाच्या रसात २ चमचे पपईचा रस मिसळून प्या. या मिश्रणाचे नियमित सेवन केल्याने यकृतासंबंधित कोणतीही प्रत्येक समस्या ठीक होईल आणि पोटदेखील स्वच्छ होईल.

२) कारल्याचा रस – यकृत वा पोटाच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर कारल्याचा रस एक रामबाण उपाय आहे. यकृतातील दाह बरे करण्यासाठी दररोज १ग्लास कारल्याचा रस प्यावा. हा रस रिकाम्या पोटी प्या. यामुळे आपल्या यकृतशी संबंधित समस्यांमध्ये आराम मिळेल.

३) अँपल व्हिनेगर आणि मध – अँपल व्हिनेगर आणि मध यकृताच्या उपचारात अत्यंत प्रभावी आहे. यासाठी १ ग्लास पाण्यात १ चमचा अँपल व्हिनेगर आणि १/२ चमचा मध मिसळा. हे मिश्रण संपूर्ण दिवसातून २ वेळा खा. यामुळे आपले शरीर विषाक्त पदार्थांपासून मुक्त होईल आणि आपले पोट व यकृत यांचे आरोग्य सुधारेल.

४) ऑलिव तेल – यकृत निरोगी ठेवण्यासाठी आणि यकृताचे कोणत्याही रोगापासून संरक्षण करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खूप फायदेशीर आहे. त्यामुळे जर यकृतावर सुज असेल तर ऑलिव्ह ऑईलचे सेवन करा. यामुळे यकृताचे आरोग्य सुधारेल आणि यकृत निरोगी राहील.