कोरोना व्हायरस कशा पद्धतीने आपल्या शरीरात काम करतो?

हॅलो आरोग्य ऑनलाईन। काही दिवसापासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येतहि वाढ होताना दिसत आहेत. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात आणि भारतात भीषण रूप धारण केले आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेदरम्यान विषाणूमध्ये अनेक बदल झालेले आहेत. त्यामुळे अनेक गंभीर परिणाम शरीरावर होत आहेत. त्यामुळे अनेक लोकांचा जीव जात आहे.कोरोनापासून वाचायचे असेल तर मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळले पाहिजे.

कोरोनाच्या विषाणूची सुरुवातीच्या सुरुवातीच्या काळात खूप साधी लक्षणे दिसून येत आहेत, सुरुवातीच्या काळात ताप आणि खोकला साधारण असतो. पण त्यानंतर मात्र हळू हळू लक्षणांमध्ये वाढ होते.आणि आजार जास्त बळावला कि, मृत्यूचा धोका सर्वात जास्त निर्माण होतो.सुरुवातीला साधारण वाटणारा हा आजार डायरेक्ट श्वसन यंत्रणेवर हल्ला करत आहेत. हा विषाणू आपल्या शरीरात नेमक्या कोणत्या प्रकारे आणि कशा पद्धतीने त्याची मुळे रोवत आहेत, याबाबत माहिती घेऊया …

सुरुवातीपासून मोठे संकट बनत गेलेला या विषाणूला जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक संकट म्हणून घोषित केले होते.या विषाणूचे शास्त्रीय नाव SARS COV -२ असे आहे. हा विषाणू शरीरात गेल्यापासून ते त्याची लक्षणे दिसण्यापर्यंतचा काळ म्हणजे ‘इन्क्युबेशन’ काळ असे म्हंटले जाते. हा विषाणू एकदा का शरीराला चिटकून बसला कि,त्यानंतर तो हळू हळू आपली मुळे पसरतो, आणि श्वासाच्या समस्या जास्त प्रमाणात निर्माण करतो. त्यामुळे सुरुवातीला साधा वाटणारा हा आजार श्वास घ्यायला त्रास निर्माण करतो.हा विषाणू घश्याच्या आसपास ज्या काही पेशी आहेत, त्या पेशींवर हल्ला चढवतो. आणि त्यांना निकामी करतो. त्यांनतर श्वसननलिका आणि फुफ्फुसांवर हल्ला चढवतो आणि हळूहळू कोरोनाच्या विषाणूच्या संख्येमध्ये वाढ करतो. कधी कधी आपण आजारी आहोत असे क्रित्येक लोकांना कळतच नाही.पाच दिवसानंतर त्याची लक्षणे दिसायला सुरुवात होते. काही लोकांना अगदी सामान्य लक्षणे दिसतात. सर्दी आणि खोकला, अंगदुखी, घसा खवखवणे आणि डोकेदुखीसुद्धा असते.त्यानंतर जर आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर मात्र आपल्या मेंदूला आणि शरीराला अलर्ट करते. त्यानंतर कोरोनाचा सामना करण्यासाठी शरीर स्वतः सायकोटाइन नावाचे रसायन तयार करते.कोरोना विषाणूची लागण झालेल्या बहुतांश व्यक्तींना कोरडा खोकलाच असतो. खोकल्यात कफ नसतो. मात्र, काही जणांचा घसाही खवखवतो.खूप कमी लोकांच्या खोकल्यात कफ असतो.शरीराच्या बाहेर जो काही कफ पडतो. त्याच्यामध्ये काही प्रमाणात कोरोनाचे विषाणू असतात.इतक्या साध्या लक्षणांसाठी ऍडमिट होण्याची काहीच आवश्यकता नसते.

नवीन संशोधनानुसार, कोविडच्या दुसऱ्या लाटेतील विषाणूची लक्षणे पूर्णतः वेगळी आहेत.सुरुवातीला नाकातून पाणी गळते म्हणजे सर्दी झाल्यासारखे वाटते. या विषाणूमुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती पूर्णतः ढासळते.हा विषाणू तोंडावाटे श्वसननलिकेतून फुफ्फुसात गेल्यावर तिथे छोट्या-छोट्या हवेच्या पिशव्या तयार करतो. हा विषाणू कसा काम करत आहे, यावर अजूनही संशोधन सुरु आहे. कोरोनाने तयार केलेल्या छोट्या-छोट्या हवेच्या पिशव्यांमध्ये पाणी साठू लागतं. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास निर्माण होतो त्यावेळी मात्र पेशंटला व्हेंटिलेटरची गरज जास्त भासते.त्यानंतर  हळू हळू एक एक अवयव निकामी होतात.फुफुसांवर सूज आल्याने श्वास घेण्यास त्रास निर्माण होतो. त्यामुळे मृत्यूचा धोका वाढतो. अशा वेळी कृत्रिम फुफुस याचा वापर करून शरीरातील रक्त बाहेर काढून ते ऑक्सिजनेट करून ते पुन्हा शरीरात पाठवले जाते. पण याचा पण असर किती पडेल असे  सांगता येऊ शकत नाही.