| | | |

तांदळाची पिठी आरोग्यदायी किती?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या दैनंदिन आहारात आपण भात खातो. हा भात म्हणजेच तांदूळ. तांदळामध्ये अनेको असे घटक आहेत जे आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे आणि तितकेच फायदेशीर आहेत. तथापि, जेव्हा तांदळाचे पीठ आहारात वापरले जाते, तेव्हा तेदेखील आरोग्याच्या दृष्टीने एक उत्तम पर्याय मानले जाते. कारण फायबर व्यतिरिक्त, तांदळाच्या पिठात असंख्य खनिजे असतात. हि खनिजे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. शिवाय, त्वचेचे स्वरूप आणि त्रासदायक त्वचेच्या आजारांपासून मुक्तता करण्यासाठी तांदळाचे पीठ मदत करते. चला तर जाणून घेऊयात तांदळाच्या पिठाचे आरोग्यदायी लाभ खालीलप्रमाणे:-

१) प्रथिनपूर्ण – तांदळाचे पीठ अत्यंत प्रथिनपूर्ण असते. यामुळे अतिरिक्त प्रोटीन वाढीसाठी तांदळाच्या पीठाचा इतर पिठांसह वापर करता येतो. यामुळे शक्य असल्यास गडद तांदळाच्या पिठाची निवड करा. कारण हे खनिज आणि पोषक घटकांच्या बाबतीत जास्त फायदेशीर आहे. गडद तांदळाच्या पिठामध्ये झिंक आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे हे पीठ अधिक आरोग्यदायी मानले जाते.

२) फायबरयुक्त – तांदळाचे पीठ फायबर मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. फायबर अन्नपचन प्रक्रियेस सुलभ करते आणि पोटाच्या समस्या उद्भवण्याचा धोका कमी करते. आपल्या शरीराला पुरेसे फायबर न मिळाल्यास बद्धकोष्ठता, पेटके आणि अतिसार होते.

३) पचनप्रक्रिया सुलभ – अपचन ही एक सामान्य समस्या आहे. बर्‍याच गोष्टींमुळे बद्धकोष्ठता उद्भवते. यासाठी फायबर गरजेचे आहे. कारण ते आतड्यांमधील अन्नाची वाहतूक करून चांगल्या पचनास प्रोत्साहित करते. यासाठी तांदळाचे पीठ फायदेशीर आहे. कारण तांदळाच्या पिठात शरीराला आवश्यक तितके फायबर पुरवण्याची क्षमता आहे.

४) यकृतासाठी फायदेशीर – तांदळाच्या पीठाचे सेवन मुख्य पोषक आणि खनिजांसह यकृताच्या योग्य कार्यासाठी मदत करते. तांदळाच्या पिठात कोलीन असते. जे यकृतामधून शरीरातील इतर भागात कोलेस्टेरॉल मिळविण्यासाठी आवश्यक असते. अशाप्रकारे, यकृताच्या चांगल्या कार्यासाठी तांदळाच्या पिठातील कोलीन महत्त्त्वपूर्ण भूमिका निभावते.

५) हाडांची मजबुती – तांदळाचे पीठ कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. यामुळे हाड वाढवणार्‍या कॅल्शियमच्या इतर स्रोतांसह तांदळाचे पीठ एकत्र केले तर नियमित शरीराच्या गरजेइतके कॅल्शियम मिळते.

६) स्किन एक्सफोलियंट – एक्सफोलीएटिंग म्हणजे त्वचेवरील मृत त्वचा पेशी आणि मोडतोड काढून टाकण्याची प्रक्रिया होय. यासाठी तांदळाचे पीठ उत्कृष्ट आणि प्रभावी पर्याय आहे. एखाद्या फेसपॅकप्रमाणे तांदळाचे पीठ चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत होते. यासाठी तांदळाच्या पिठाबरोबर, मध आणि साखर योग्य प्रमाणात घ्या आणि याचे एकत्रित मिश्रण पातळ करण्यासाठी पाणी घाला. यात आपण लिंबाचे काही थेंबही घालू शकता. हे मिश्रण चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून सुकल्यावर चेहरा धुवून घ्या.

७) सैल त्वचेच्या समस्येवर परिणामकारक – तांदळाच्या पिठाचा सैल त्वचा घट्ट करण्यास वापर होतो. यासाठी तांदळाचे पीठ थोड्याश्या पाण्यात मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर दहा मिनिटे लावून ठेवा. साधारण १५ मिनिटे हा फेसपॅक कोरडा होऊ द्या आणि यानंतर स्वच्छ धुवा.