How is the uterus of women formed?

कसे बनले आहे स्त्रियांचे गर्भाशय

हॅलो आरोग्य ऑनलाईन । महिलांचे शरीर हे फार गुंतागुंतीचे बनले गेले आहे. एकाच शरीरात अनेक गोष्टी घडून त्याच्यापासून नवीन पुनरावृत्ती पण होताना दिसत आहे. स्त्रिया या गरोदर राहिल्या असतील तर त्यावेळी त्याच्या बाळाची वाढ हि गर्भाशयातच होते. गर्भाशय हे महिलांच्या पोटाच्या खालच्या बाजूला असते. बाळ वाढत असताना त्या गर्भाशयाचा आकार पण वाढलेला दिसतो.

गरोदर राहिल्यानंतर काही काळाने महिलांच्या शरीरात किंवा पोटात काहीतरी हलल्यासारखा भास हा निर्माण होतो. त्यावेळी बेली हि उंचावली पण जाते.
काही वेळा त्रास आणि वेदना यांचे प्रमाण हे जास्त असते. त्यावेळा समजते कि गर्भाशयात काहीतरी घडते आहे. ज्या वेळी महिला या गरोदर असतात अश्या वेळी महिलांच्या पोटाचा आकार हा प्रत्येक आठवड्याला वाढलेले पाहायला मिळते.

नेमके कसे बनले आहे गर्भाशय —

—- गर्भाशय हे मऊ शार स्नायूंच्या ग्रंथाने बनले गेले आहे. ज्यावेळी मासिक पाळी येते त्यावेळी या ग्रंथी या दाट या होत जातात. आणि आपले स्नायू हे आखडले जातात. ज्यावेळी महिलांची मासिक पाळी येते त्यावेळी त्यांच्या गर्भशयात असलेल्या ग्रंथी या बाहेर फेकल्या जातात. पण त्यावेळी महिलांच्या शरीरात ओव्यूलेशन होते अश्या वेळी महिलांच्या पोटात गर्भांची वाढ सुरु झालेली असते . आणि त्यामुळे पोटाचा आकार हा वाढत जातो. गर्भशय हे स्नायूंच्या तंतुमय उतीपासून बनल्या गेलेल्या असतात. गर्भाशय योनी, मूत्राशय, आणि गुदाशय ह्यांना आधार देत असते. त्यांना धरून ठेवते.