| |

फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न किती काळानंतर खाऊ नये?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। धावपळीचे जीवन आपल्याला अनेको अश्या गोष्टींकडे वळविते ज्याबद्दल आपण कधी विचारही केलेला नसेल. कमी वेळात अधिक गोष्टींकडे झेप घेण्यासाठी आपण कितीतरी आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करीत असतो. आजकाल पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या स्त्रिया कमी वेळेत काम सोयीस्कर होण्यासाठी मिक्सर, फ्रिज यांसारख्या आधुनिक उपकरणांचा सर्रास वापर करतात. मुख्य म्हणजे खरोखरीच या उपकरणांमुळे आयुष्य सुखकर झाले आहे. त्यामुळे, आता प्रत्येकाला फ्रीजची गरज भासू लागली आहे. कारण अनेकदा उरलेले अन्न पुन्हा खाण्यासाठी योग्य राहीलच याची काहीही शाशवती नसते मात्र अन्न टिकवण्यासाठी फ्रीज अत्यंत महत्वाची भूमिका बजावीत. त्यामुळे सहाजिकच भाज्या, फळं, दूध आणि उरलेले अन्न टिकवण्यासाठी आपण फ्रीजचा वापर करतो. पण मित्रांनो, तुम्हाला हे माहीत आहे का कि फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न पदार्थ किती काळ फ्रेश राहतात? हे अन्न किती काळानंतर खाऊ नये ? जर असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर हि माहिती जरूर पूर्ण वाचा.

० फ्रिजमधील अन्न किती काळानंतर खाऊ नये?
– अन्नपदार्थ उरले की ते दुसऱ्या दिवशी खाण्यायोग्य राहावे म्हणून आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो. कारण आपल्याला वाटतं, फ्रीजमध्ये अन्न कधीच खराब होत नाही. पण मैत्रिणींनो, प्रत्येक पदार्थ खराब होण्याची एक विशिष्ठ वेळ असते. त्यामुळे असे पदार्थ फ्रीजमध्येही खराब होतात. यासाठी जाणून घ्या महत्वाच्या बाबी:-
१) फ्रीजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ बाहेर काढल्यावर गरम न करता खाऊ नये.
२) फ्रिजमधून अन्न पदार्थ बाहेर काढून लगेच गरम करण्यासाठी गॅसवर ठेवू नका. पंधरा ते वीस मिनीट सामान्य तापमानाला आल्यावर गरम करा.
३) गव्हाची पोळी वा पराठा फ्रीजमध्ये ठेवायचा असेल, तर तो एका दिवसाच्या आत खाल्ला पाहिजे. एका दिवसापेक्षा जास्त गव्हापासून बनवलेली पोळी वा पराठा फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यातील पोषण निघून जाते.
४) डाळ आणि कडधान्यांची उसळ फ्रीजमध्ये ठेवली असेल तर ती २ दिवसांत खा. कारण यानंतर अश्या पदार्थांमध्ये गॅस निर्माण होतो. ज्यामुळे अपचन होते.
५) फ्रीजमध्ये शिळा भात ठेवलात तर दोन दिवसांत संपवा.
६) कापलेली वा चिरलेली फळे फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर ती काही तासांमध्ये संपवा. कारण फळ कापल्यानंतर वातावरणाच्या संपर्कात आल्यामुळे लवकर खराब होते.
७) फ्रीजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ, फळं आणि भाज्या जास्त काळ फ्रेश राहण्यासाठी फळ अथवा भाज्यांसोबत शिजवलेल्या भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ ठेवू नका. यामुळे भाज्यांवरील तंतुमय घटक सर्व पदार्थ खराब करते.
८) फ्रीजमध्ये फळं आणि भाज्या देखील एका ठराविक काळासाठीच स्टोअर करून ठेवा. कारण प्रत्येक फळ आणि भाजीचा टिकण्याचा एक ठराविक कालावधी असतो. त्यानंतर असे पदार्थ खराब होतात आणि इतर पदार्थ दूषित करतात.