|

कोरोना होऊन गेल्यानंतर शरीरात किती दिवस अँटीबॉडीज राहतात? जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अँटीबॉडीज म्हणजे शरीरातील असं तत्त्व, ज्याची निर्मिती आपली इम्यून सिस्टिम करते. यामुळे आपले शरीर कोणत्याही विषाणूशी लढण्याकरिता सक्षम होते. इटलीमधील संसर्ग शास्त्रज्ञांनी कोरोना होऊन गेल्यानंतर आपल्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजबद्दल सांगताना एक विशेष माहिती दिली आहे. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार त्यांच्या मते, कोरोनामधून बरे झाल्यानंतर जवळ जवळ आठ महिन्यांपर्यंत त्या रुग्णाच्या शरीरातील रक्तात कोरोनाविरूद्ध तयार झालेल्या अँटीबॉडीज असतात. या व्यतिरिक्त काही कोरोना रूग्णांच्या सानिध्यात राहून त्यांच्यावर संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत कोरोनाविरूद्ध अँटीबॉडीज रुग्णाच्या शरीरात राहतात तोपर्यंत संसर्ग विषाणूचा धोका त्याच्यासाठी कमी होतो.

याच संदर्भात अनेक वैज्ञानिक आणि संशोधकांनी विविध अभ्यास केला आहे. यात काही डॉक्टरांचादेखील समावेश आहे. दरम्यान मिलानमधील सॅन राफेल या रूग्णालयाच्या डॉक्टरांच्या निकषानुसार ते म्हणाले कि, कोरोना संक्रमित होऊन गेलेल्या रूग्णांमध्ये तयार झालेल्या अँटीबॉडीज रुग्णांचे जास्त वय किंवा त्यांना अन्य आजार असले तारींगी त्यांच्या रक्तात उपस्थित असतात. अशा परिस्थितीत तो रुग्ण कोणत्याही संसर्ग विषाणूमुळे आजारी पडण्याचा धोका अतिशय कमी होतो.

शिवाय इटलीच्या आय.एस.एस. नॅशनल हेल्थ इन्स्टिट्यूटमध्ये काम करणाऱ्या काही संशोधकांनी या अभ्यासासाठी कोरोना विषाणूची लक्षणे असलेल्या जवळ जवळ सुमारे १६२ रुग्णांची निवड केली होती. त्यांच्या रक्ताचे नमुने प्रथम मार्च २०२० आणि एप्रिल २०२० महिन्यामध्ये घेण्यात आले होते. यानंतर, कोरोना विषाणूशी लढत देऊन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने नोव्हेंबर २०२० मध्ये पुन्हा घेण्यात आले. यानंतर संशोधकांनी या संदर्भात केलेल्या अभ्यासानुसार त्यांनी असे म्हटले आहे की, कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्या रुग्णाच्या शरीरात त्यापुढील आठ महिन्यांपर्यंत अँटीबॉडीज आढळले.