makeup

मुली वापरत असलेले मेकअप साहित्य किती दिवस वापरले जावे ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । मुलींना मेकअप करायला फार आवडतो. मुली या मेकअप केल्याने खूप छान दिसतात. मुलीच्या सौदर्यात हा मेकअप ने खूपच फरक जाणवतो. त्यामुळे प्रत्येक मुलीकडे मेकअप किट हा असतोच .सुदंर दिसण्यासाठी मुली नवीन नवीन प्रॉडक्ट चा वापर करतात. पण ज्यावेळी मुली या एखादे साहित्य खरेदी करत असतील तर कमीत कमी त्या प्रॉडक्ट ची एक्सपायरी डेट पाहणे गरजेचे असते. प्रत्येक मेकअपचे साहित्य किती दिवस वापरायचे याची देखील एक मुदत असते. पण अनेक जण याचा विकचर न करता मुदत संपली तरी मेकअपचे साहित्य वापरात असतात यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. साधारणतः कोणते सौंदर्य प्रसाधन किती दिवस वापरायचे हे आपण पाहणार आहोत.

— फेस पावडर

रोजच्या वापरातील फेस पावडर दोन वर्षांपर्यंत वापरण्यास काही हरकत नाही. त्यामुळे चेहरा हा तजेला वाटतो.

— लिपस्टिक

एक लिपस्टिक एका वर्षापेक्षा अधिक ओठाकरता हानिकारक असते. काही लिपस्टिकची मुदत दोन वर्ष असते पण साधारणता एक वर्षपेक्षा जास्त दिवस एक लिपस्टिक वापरू नये. एक्पायर लिपस्टिक वापरल्याने ओठ काळे पडू लागतात. त्यामुळे लिपस्टिक वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे.

— लिप ग्लॉस

ओठांना चमकदार करण्यासाठी वापरण्यात येणारे लिप ग्लॉस साधरणतः दीड वर्षानंतर वापरू नये.

— आय लाइनर

जेल किंवा लिक्विड आय लाइनर दोन ते तीन महिन्यानंतर बदलावे.परंतु पेन्सिल लायनर लाइनरने दोन वर्ष टिकते. तरी त्यावरील एक्सपायरी डेट नुसार ते बदला.

— फाउंडेशन

सर्रास मुली दररोज सुद्धा याचा वापर करतात. क्रीम कॉम्पॅक्ट फाउंडेशन 18 महिन्यात बदलायला हवे तसेच हल्ली सगळ्यात प्रसिद्ध असणारे ऑईल फ्री फाउंडेशन वर्षभर वापरू शकता.

— कंसीलर
कंसीलर मुळे चेहऱ्यावरचे डाग लपवता येतात. हे कंसीलर साधारणतः एक ते दीड वर्षे चालते परंतु जर काही ऍलर्जी जाणवल्यास त्याचा वापर करणे थांबवावे.

— आय शॅडो
क्रीम आय शॅडो एक वर्ष वापरला तरी चालू शकतो परंतु पावडर आय शॅडो साधरणतः दोन वर्षे चालते.

— मस्करा
मस्करा दोन ते तीन महिन्यात खराब होते. पण कोणतीच वस्तू हि जास्त कालावधी वापरू शकता नाही. आणि जर त्या वस्तूंचा कालावधी संपला गेला असेल तर त्यावेळी ती वस्तू फेकून देणे गरजचे आहे. चेहऱ्यावर जर वापरले गेले तर त्यामुळे वेगवेगळ्या समस्या या निर्माण होऊ शकतात.