Salt
| | |

दिवसभरात किती मीठ खाणे योग्य आहे?; जाणून घ्या काय सांगतो रिसर्च रिपोर्ट

हॅलो आरोग्य ऑनलाईन। माणूस खवैय्या असो किंवा नसो. जेवणात मीठ कमी आहे का जास्त हे जिभेचे ज्ञान असलेली कोणतीही व्यक्ती अगदी सहज सांगू शकते. अनेक लोकांना जेवणात खारे पदार्थ खायला आवडतात. जसे कि, खारे मासे, खारे शेंगदाणे, खारी डाळ असे अजून अनेक पदार्थ आहेत जे कितीतरी लोक अगदी मिचक्या मारत खातात. पण तुम्हाला माहित आहे का? हे असे खारे पदार्थ जिभेच्या चवीला भारी वाटत असले तरी आरोग्यालाही भारी पडत असतात. अर्थात मिठाच्या अतिसेवनामुळे शरीराचे नुकसान होत असते. याचे कारण म्हणजे मीठ सोडियम आणि पोटॅशियम यापासून तयार होत असते. म्हणून आपण जेव्हा मीठ खातो तेव्हा मिठातील सोडियम रक्तदाबावर परिणाम करतात. यामुळे आपल्याला रक्तदाबाच्या समस्या आणि हृदय विकारासह, स्ट्रोकचा धोका संभवतो. त्यामुळे मीठ खाण्याला एक सीमा असणे गरजेचे आहे.

सामान्य मिठामध्ये 40% सोडियम आणि 60% क्लोराईड असते. आपल्या शरीराला यांपैकी केवळ 500 मिलीग्राम सोडियमची गरज आहे. कारण जास्त सोडियम शरीरासाठी घातक ठरू शकते. परिणामी रक्तदाब, हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. शिवाय हाडांमधील कॅल्शियमची मात्रा कमी होते.

सामान्य मीठ

जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार, बहुतेक लोक दररोज 9 – 12 ग्रॅम इतके मीठ खातात आणि यामुळे रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जगात दरवर्षी मीठामुळे सुमारे 25 लाख मृत्यू होतात.

मिठाचे विविध प्रकार

जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार, कोणत्याही प्रौढ व्यक्तीने दररोज 2 ग्रॅमपेक्षा अधिक सोडियमचे सेवन करू नये. अर्थात दररोज 4 ते 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाणे आरोग्यासाठी हितकारक नाही.

मिठाचे नियमित पण संतुलित सेवन

तसेच रोजच्या आहारातून सोडियमची मर्यादा 1500 मिलीग्रॅम असावी. अधिकाधिक 2300 मिलीग्रॅम. मात्र यापेक्षा जास्त सोडियमचे सेवन शरीराचे नुकसान करू शकते.