How should a mother take care of older girls?

वयात आलेल्या मुलींची आईने कशी काळजी घ्यावी?

हॅलो आरोग्य ऑनलाईन| कोणत्याही वयातील मुलींची सर्वात जवळची मैत्रीण म्हणजे आई असते . मुली आपल्या सगळ्या समस्या या आपल्या आईकडे विचारतात.कारण आई त्याच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नाचे निरसन करू शकेल . अश्या वेळी आईने आपल्या मुलीसोबत कश्या प्रकारे वागले पाहिजे . तिच्या समस्या या कश्या जाणून घेतल्या गेल्या पाहिजेत याची माहिती घेऊया ….

आपली मुलगी वयात येत असताना . तिच्यामध्ये झालेले बद्धल हे लक्षात घेणे आवश्यक आहे . तिच्या स्वभावात अनेक बदल होतात. त्यावेळी तिला समजून घेऊन तिच्याशी प्रेमाने बोलले पाहिजे. कोणत्याही परिस्थिती तिच्यावर रागावले जाऊ नये. तिच्या वागणुकीत झालेले बदल हे आईने स्वीकारले गेले पाहिजेत . तिच्या अनेक शंका – कुशंका असतील तर त्याच्यावर निरसन करणे आवश्यक आहे . पाळी येणे किंवा न येणे कि नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे त्या गोष्टीला आपण रोखू शकत नाही. त्या काळात येणारी पाळी म्हणजे खूप शरमेची गोष्ट आहे . असे मुलींना वाटते . पण हि गोष्ट त्याच्या मनातून काढून टाका. त्या काळात कश्या पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे ते समजावणे गरजेचे असते. त्या काळात आपल्या शरीराची स्वच्छता कशी केली पाहिजे याची माहिती त्या आईकडून घेतात.

मुलींच्या मध्ये होणारे शारीरिक आणि मानसिक बदल जाणून घेऊन तिच्या येऊ घातलेल्या पहिल्या पाळीच्या संदर्भात तिचे मन तयार करणे, पाळी म्हणजे काय याची माहिती करून देणे हे प्रत्येक मुलीच्या आईचे कर्तव्य आहे. पूर्वीच्या काळी घरात खूप मोठी आणि वयस्कर लोक होती. त्यामुळे अश्या काही समस्या निर्माण झाल्या तर समजून सांगणारे लोक सुद्धा खूप होती. आजकाल विभक्ती कुटुंब पद्धतीमुळे मुलींना अश्या सगळ्या गोष्टी सांगणारे खूप कमी लोक हे कुटुंबात असतात . त्यामुळे आईने मुलींना समजावून घेणे आवश्यक आहे . मुलींच्या त्या संक्रमणावस्थेच्या काळात आईने तिच्याशी हळुवारपणे, मैत्रीच्या नात्याने वागून, विश्वासात घेऊन मुलीचे मनोधैर्य वाढवले पाहिजे. त्यांच्या कमी झालेला आत्मविश्वास वाढवण्यास आईचा मोलाचा वाटा असतो. मुलीचे व्यक्तिमहत्तव हे व्यवस्थित करण्यास भर दिला गेला पाहिजे .