diet

आहारात भोजन कसे असावे ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्याला दररोज काही प्रमाणात भोजन करावेच लागते . उपाशी राहून आपण आपली मनस्थिती हि खराब करून घेत असतो. त्यामुळे दररोज काही पौष्टिक पदार्थ हे आपल्या आहारात असणे गरजेचे आहे . आहारात पदार्थ समाविष्ट करत असताना नेहमी घरात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विचार करून खाण्यात काही पदार्थ समावेश  करणे आवश्यक आहे .

आपली दररोज ची कामे करत असताना , आपण खूप ऊर्जा हि खर्च करत असतो. अश्या वेळी आपल्या शरीराला योग्य प्रकारची ऊर्जा मिळण्यासाठी आहारात दररोज काही ना काही खाणे गरजेचे आहे . भूक लागली कि , काहीतरी खाणे हा निसर्गाचा नियम आहे . आपल्या शरीरात ऊर्जा हि साठवून राहण्यासाठी प्रत्येकी दर दोन ते तीन तासांनी आहारात काही पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे एकाच प्रकारचा आहार हा वारंवार घेतला जाऊ नये . कारण त्याच्या मधून मिळणारी जीवनसत्वे हि एकसारखी असतात .

आपल्या आहारात काही पदार्थाचा समावेश करताना नेहमी वेगवेगळ्या कर्बोदके असणाऱ्या पदार्थांचा वापर हा केला जावा. तसेच प्रथिने सुद्धा आपल्या आहारात असणे गरजेची आहेत . ऊर्जा देणाऱ्या पदार्थामध्ये गहू , ज्वारी , लोणी , तूप असे काही पदार्थ आहारात असणे गरजेचे आहे . दुपारी आणि संध्याकाळी आपल्या आहारात नेहमी वरण , भात , पोळी आणि भाजी यांचा समावेश असणे आवश्यक आहे . त्यामुळे आपल्या शरीराला सकस आहार मिळू शकतो.