| | |

पावसाळ्यात अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळालं?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या राज्यात मान्सूनला सुरुवात झाली आहे. राज्यात अर्ध्या अधिक भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. तर काही भागांमध्ये हलक्या सरीनंतर मात्र पाऊस दडून बसला आहे. तर पाऊस पडूनही उन्हाचा दाह काही कमी होईना. अश्या या पावसाळा आणि उन्हाळ्याचे संमिश्र हंगाम सध्या सुरु आहे. जे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक आहे. कारण या हंगामात कोणत्याही अन्नातून सहज विषबाधा होण्याचा धोका मोठा असतो. यामुळे आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

आपल्याला अन्नातून विषबाधा झाली आहे हे समजण्यास बहुतेकदा वेळ लागतो. तर या विषबाधेचे प्रमुख व सर्वात मोठे लक्षण असे आहे कि, जेवल्यावर १ ते ६ तासाच्या दरम्यान सातत्याने उलटया होणं. जर असे काही तुमच्या बाबतीत झाले तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अन्नातून विषबाधा होण्याची कारणे आणि त्यापासून बचाव करण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊ.

  • अन्नातून विषबाधा होण्याची मुख्य करणे खालीलप्रमाणे :-

१) अस्वच्छ वा घाणेरड्या भांड्यात अन्न शिजवणे किंवा खाणे.

२) ढवळले शिळे अन्न आणि बुरशी लागलेले अन्न खाणे.

३) कमी आणि अर्धवट शिजलेले अन्न खाणे.

४) गरजेपेक्षा अधिक मांसाहार करणे.

५) फ्रिजमध्ये बऱ्याच वेळा गरम करून ठेवलेले अन्न खाणे.

  • अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळता येईल?

– बॅक्टेरियायुक्त अन्न खाण्यामुळे बहुतांशी लोकांना विषबाधा होते. हे टाळण्यासाठी प्रयत्न करा कि, घरात फक्त ताजेच अन्न तयार केले जाईल.

– त्यात तुम्ही बाहेरील खाद्य पदार्थ खाण्याचे शॉकीन असाल, तर हे लक्षात ठेवा की रस्त्यावरील उघड्यावरचे खाद्य पदार्थ किंवा अति थंड आणि असुरक्षित असे अन्न खाऊ नये.

– संध्याकाळच्या वेळी आंबट पदार्थ खाणे टाळा.

– पावसाळी हवामानात ब्रेड, पाव यांसारख्या बेकरी पदार्थांना बुरशी लागते. त्यामुळे हे पदार्थ खरेदी करताना किंवा खाताना मुख्य करून तपासणे आवश्यक आहे.

– कोणताही पदार्थ खरेदी करतेवेळी त्याची उत्पादन तारीख तपासा. कोणत्याही उत्पादन तारखेपुढील पदार्थाचे सेवन करू नका.

– घराच्या स्वयंपाकघरात स्वच्छता ठेवा. अन्न तयार करण्यासाठी कोणतीही घाणेरडी भांडी वापरू नका.