How to change the diet of people with asthma

दमा असलेल्या लोकांनी आहारात कसे बद्धल करावेत?

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  दमा हा आजार आजकाल कोणत्याही वयातील लोकांना हा होऊ शकतो . त्यामुळे त्या आजारासाठी खूप काळजी घ्यावी लागते. दम्याचा कायम स्वरुपी काही उपचार नाही पण या वर नियंत्रण ठेवता येते. श्वास घेताना होणार त्रास दमा म्हणवला जातो. ऍलर्जी किंवा प्रदूषणामुळे लोकांमध्ये ही समस्या आढळून येते.वाढत्या प्रदूषणामुळे दमा होतो आणि श्वास घेण्याच्या समस्या या जास्त प्रमाणात जाणवतात.

खोकला, श्वास घेण्यात अडचण होते नाकातून आवाज येण्यासारखे त्रास उद्भवतात. लोक या त्रासापासून सुटका मिळविण्यासाठी होमिओपॅथिक औषधें घेतात पण काही घरगुती उपाय करून देखील आपण या त्रासापासून आराम मिळवू शकतो. आज आम्ही आपल्याला दम्याच्या आजारासाठी काही घरगुती उपाय सांगत आहो, ज्या मुळे आपण या त्रासातून आराम मिळवू शकता.

— मेथीदाणे

मेथी पाण्यात उकळवून या मध्ये मध आणि आल्याचा रस मिसळून दररोज प्यायल्यानं दम्याच्या त्रासापासून आराम मिळेल.

— केळी

एक पिकलेले केळ सालासकट भाजून नंतर त्यावरील साल काढून केळीचे तुकडे करून त्यावर काळी मिरपूड घालून गरम गरमच दम्याच्या रुग्णाला द्यावे. या मुळे रुग्णाला आराम मिळेल.

— लसूण

दम्याच्या आजारात लसूण खूप प्रभावी आहे. दम्याच्या रुग्णांनी लसणाचा चहा किंवा 30 मिमी दुधात लसणाच्या 5 पाकळ्या उकळवून घ्या आणि या मिश्रणाचे दररोज सेवन केल्यानं दम्याच्या सुरुवातीच्या काळात चांगला फायदा होतो.

— ओवा आणि लवंग

गरम पाण्यात ओवा घालून वाफ घेतल्यानं दम्याच्या त्रासाला नियंत्रित करण्यात आराम मिळतो. हे घरगुती उपचार खूपच फायदेशीर आहे. काही प्रमाणात लवंग घेऊन आणि त्या उकळावं. या मिश्रणाला गाळून या मध्ये एक चमचा शुद्ध मध मिसळा आणि गरम गरम प्या. दररोज दोन ते 3 वेळा हा काढा बनवून प्यायल्यानं रुग्णाला आराम मिळेल.

— तुळशी

तुळशी दम्याला नियंत्रित करण्यात फायदेशीर आहे. तुळशीची पाने स्वच्छ करून त्यावर काळी मिरपूड घालून जेवताना दिल्यानं दमा नियंत्रणात राहतो. या शिवाय तुळशी पाण्यासह वाटून त्यामध्ये मध टाकून चाटल्याने दम्याच्या त्रासापासून आराम मिळतो.