How to check for breast cancer at home?

ब्रेस्ट कॅन्सर ची घरगुती पद्धतीने कशी कराल तपासणी ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेक महिलांना स्तनांचा कॅन्सर हा जाणवायला लागतो. पण कधी कधी स्त्रीया त्याकडे दुर्लक्ष करतात. ज्यावेळी त्याचे स्वरूप हे खूप मोठे होते त्यावेळी त्याच्यावर इलाज करणे मग फार अवघड होते . त्यामुळे अश्या प्रकारचा त्रास सुरू असेल तर त्यावेळी मात्र आपल्याला त्यावर उपचार घेणे आवश्यकच असते. घरच्या घरी आपल्या स्तनाची कशी तपासणी घेऊ शकता?  हे जाणून घेऊया…

स्तनांची तपासणी करण्याचे दोन प्रकार आहेत. आपण घरगुती पद्धतीने स्तनांची काळजी ही घेऊ शकतो. त्यासाठी आरशासमोर उभं राहून किंवा झोपून आपण स्तनांची तपासणी करू शकतो.

— स्तनांचा आकार, रंग बदलला आहे का हे पहाणे.त्यावरून समजू शकते की कॅन्सर आहे की नाही ते.

— स्तनांना सूज येणं, स्तन लाल होणे, व्रण आले आहेत का याकडे लक्ष द्या.

— स्तनाग्रांची जागा बदलली आहे का हे पाहा?

— निपल आतील बाजूस गेले असतील तर लक्ष देणं गरजेचं आहे.

— निपलमधून पाणी, रक्त किंवा पिवळ्या रंगाचा पदार्थ येतो का याकडे लक्ष ठेवा.

—- हाताच्या तीन बोटांनी स्तनांच्या वर, खाली, डाव्या-उजव्या बाजूला आणि त्यानंतर गोलाकार पद्धतीने पूर्ण स्तनांवर हात फिरवून पाहा

— तीन बोटांच्या मदतीने काखेत हळूवार दाब देऊन खूप दुखत असेल तर समजून घ्या की कॅन्सर ची लक्षणे साधारण सुरू झाली आहेत.