Health Tips
| |

Health Tips : रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यातून सेवन करा ‘हे’ 3 पदार्थ, सकाळी उठल्यावर पोट होईल अगदी स्वच्छ !

Health Tips : वारंवार बाहेरचे पदार्थ सेवन करणे, जंक फूड, पिझ्झा बर्गर, नूडल्स यासारखे पदार्थ सेवन केल्याने आपल्या पोटाचे आरोग्य बिघडते. वारंवार बाहेरचे पदार्थ सेवन केल्याने पोटाचे आरोग्य बिघडतेच पण त्याचबरोबर बद्धकोष्ठता, पचन वेळेवर न होणे, गॅस ऍसिडिटी, यासारखे गंभीर आजार देखील आपल्याला भविष्यात सतावण्याची शक्यता असते म्हणूनच आपल्या पोटाचे आरोग्य सुरळीतपणे कसे चांगले राहील याची काळजी घेणेदेखील अत्यंत गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. असे म्हटले जाते ज्या व्यक्तीचे पोट वेळेवर स्वच्छ होते, त्या व्यक्तीला भविष्यात कोणतेच आजार होत नाही. परंतु जर तुमचे पोट वेळेवर स्वच्छ होत नसेल तर तुमचे शरीर हे वेगवेगळ्या आजारांचे माहेरघर बनून जाते म्हणूनच पोटाची काळजी घेणे सध्याच्या परिस्थितीत अत्यंत गरजेचे आहे.

आपल्यापैकी अनेकांना बद्धकोष्ठता सतावत असते. बद्धकोष्ठता यामागे वेगळी कारणे देखील असू शकतात. ती म्हणजे चुकीच्या पद्धतीने आहार सेवन करणे, बदललेली जीवनशैली, खूप वेळ एका जागी बसून राहणे, वारंवार बाहेरचे पदार्थ खाणे, मैद्याचे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणे, व्यायाम न करणे इत्यादी कारणे बद्धकोष्ठता समस्या निर्माण होण्यामागे असू शकतात. अशावेळी बद्धकोष्ठतेवर वेळेवर उपचार केला नाही तर भविष्यात तुम्हाला पोटाचे वेगवेगळे आजार देखील होऊ शकतात. ऍसिडिटी, पित्त, मूळव्याध यासारखे गंभीर आजार तुम्हाला सतावू शकतात. आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये तसेच घरगुती उपचारांमध्ये देखील बद्धकोष्ठता मुळापासून दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय सांगण्यात आले आहेत.

जर तुम्हाला घरबसल्या बद्धकोष्ठता मुळापासून नष्ट करायची असेल तर त्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय देखील करू शकता. हे उपाय आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये देखील अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे त्यासाठी तुम्हाला एक ग्लासभर कोमट पाणी घ्यायचे आहे. त्यानंतर एक चमचा घरगुती तूप व एक ते दीड चमचा मीठ घ्यायचे आहे.

आता आपल्याला एका पॅनमध्ये एक कप पाणी उकळायला ठेवायचे आहे आणि त्यानंतर थोडेसे पाणी कोमट होऊ द्यायचे आहे. त्यानंतर एक चमचा घरगुती तूप व अर्धा चमचा मीठ टाकायचे आहे. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव केल्यानंतर सेवन करायचे आहे. हा उपाय जर तुम्ही रात्री झोपताना केला तर सकाळपर्यंत तुम्हाला फरक जाणवू लागेल. तुम्हाला शौचाला जर कडक होत असेल तर मल देखील नरम होईल. सकाळी कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमचे पोट अगदी स्वच्छ होऊन जाईल अशा प्रकारे घरबसल्या हा उपाय तुम्ही करू शकता आणि बद्धकोष्ठतेची समस्या कायमस्वरूपी दूर करू शकता.