Diabetes
| | |

औषधाशिवाय मधुमेह कसा नियंत्रित कराल?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकालच्या जीवनशैलीमुळे अनेक व्याधींनी मानवी जीवनावर कब्जा केला आहे. यामध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह यासारख्या आजारांचा विशेष समावेश आहे. आजकाल दार दोन व्यक्तींमागे एकाला मधुमेह असतोच. एकतर हा आजार असा वरवर दिसत आंही मात्र माणसाला आतून पोखरत असतो. मधुमेहाने ग्रासलेल्या रुग्णांनी आहाराचे पथ्य सांभाळावे लागते. शिवाय हे खाऊ का नको? असा प्रश्न सतत पडलेला असतो. त्यामुळे अनेक जण जीवाला अगदी कंटाळून जातात. कारण मधुमेहाच्या रुग्णांना आयुष्यभर एकतर इन्सुलिन घ्यावे लागते नाहीतर गोळ्या औषधे. तर मित्रांनो, आज आपण औषधांशिवाय मधुमेह नियंत्रित करता येतो का? हे जाणून घेणार आहोत खालीलप्रमाणे:-

मधुमेह हा असा आजार आहे जो औषधाने बरा होत नाही. म्हणूनच जिथे मधुमेहासारखा आजार आटोक्यात येतो तो उपचार करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला आपल्या आहाराकडे आणि शरीराच्या गरजांकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी खालील सवयी शरीराला लावून घेणे अधिक फायदेशीर आहे.

सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्या – सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने अनेक आजार दूर होतात. त्यामुळे जर तुम्हाला सकाळी पाणी पिण्याची सवय नसेल तर आजपासूनच पाणी पिण्यास सुरुवात करा. यामुळे शरीरातील अनेक दूषित रक्त लघवीद्वारे शरीराबाहेर काढून टाकले जाते आणि याच्या मदतीने मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते.

व्यायाम करा – शारीरिक श्रम केल्याने शरीरातील घाम उत्सर्जित होऊन शरीराबाहेर पडतो आणि शरीरातील घाम निघून जातो. यामुळे मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते. आता शारीरिक कष्ट करण्यासारखी काम तुमच्याकडे नसतील तर सकाळी वा संध्याकाळी किमान घरी व्यायाम करा. कारण घामाच्या उत्सर्जनामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो.

पोषक आहार – मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या आहाराकडे लक्ष द्या. ज्या आहारात साखरेचे प्रमाण अधिक असेल ते खाणे प्रामुख्याने टाळा. त्याऐवजी आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा. याबाबत अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी चर्चा करा.

आयुर्वेदिक औषधी – मधुमेहासारखा आजार आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या मदतीने नियंत्रणात ठेवता येतो. कारण औषधी वनस्पतींमध्ये एक पोषक तत्व असते ज्याद्वारे शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा प्रभाव मंद असतो, मात्र प्रभावी असतो. यामुळे कदाचित तुमचा रोग मुळापासून नाहीसादेखील होईल. यासाठी उत्तम आयुर्वेदाचार्यांकडून उपचाहर करून घ्या.