Doesn't sleep well at night?
|

रात्रीची झोपच लवकर येत नाही ना? या गोष्टी करून पहा

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्या दररोज च्या दिनक्रमानंतर खूप प्रयत्न करूनही रात्रीच्या झोपेच्या समस्या या जास्त प्रमाणात जाणवतात. रात्री झोप येणे हि समस्या बऱ्याच लोकांना जाणवते. या समस्यांपासून सुटका करून घेणे अवघड आहे. पण जर या समस्यांपासून जर सुटका करून घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या दिनचर्येत बद्धल करावे लागतील. आपल्या सवयी या काही प्रमाणात बदलाव्या लागतात. त्यानुसार रात्रीच्या वेळेत लवकर झोप येण्यासाठी काय करावे ते जाणून घेऊया …

रात्रीची झोप येत नाही याची कारणे प्रत्येक वेळी वेगवेगळी असू शकतात. जर जास्त मोठ्या प्रमाणात तणाव आणि टेन्शन असेल तर सुद्धा रात्रीची झोप हि लवकर येत नाही . जर डोक्यात विचारांचे काहूर जास्त असेल तर मात्र आपली झोप हि पूर्णपणे उडते. अश्या वेळी अनेक वेळा म्हंटले जाते कि , आपले शरीर जर थकले तर मात्र आपल्याला झोप लवकर येते . त्यामुळे शरीर थकवण्यासाठी असे कोणते काम केले पाहिजे कि ,शरी थकेल आणि झोप लवकर येऊ शकेल.

सकाळी सकाळी लवकर उठून दररोज व्यायाम केला पाहिजे. त्यामुळे शरीराचा सर्व ताण हा निघून जाईल आणि दिवसभराचे कोणतेही काम करण्याचा उत्साह हा टिकून राहील. दिवसभर आपले सारे लक्ष फालतू विचार करण्यात न घालवता आपल्या कामावर लक्ष द्यावे. रात्रीच्या वेळी जास्त वेळ मोबाइल घेऊन बसू नये. मोबाईल मधून निघणाऱ्या अतिनील किरणांमुळे झोपेचे वेळापत्रक कोलमडते. त्यामुळे मोबाईल झोपेच्या वेळेत दूर ठेवा. जर प्रॉब्लेम मोठे असतील तर मात्र तुम्ही मेडिटेशन करा. झोपताना तळव्यांना मालिश करा. तळव्यांबरोबर आपल्या डोक्याला सुद्धा मालिश करा. त्याने तुम्हाला शांत झोप लागते . सगळ्यात महत्वाचे म्हणजे दुपारच्या वेळेत अजिबात झोपू नका.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *