badha konasana

बद्ध कोणासन कसे करावे ?

हॅलो आरॊग्य ऑनलाईन ।  आपल्या निरोगीदायी शरीरासाठी दररोज कोणत्या ना कोणत्या कोणत्या प्रकारचा व्यायाम करणे आवश्यक आहे.आपल्या दररोज च्या व्यायामामुळे आपल्याला कोणत्याही नॉर्मल आजाराला निमंत्रण द्यावे लागत नाही. आपल्या दररोज च्या दिनक्रमातून थोडा वेळ हा योग किंवा व्यायाम याला दिला गेला पाहिजे. त्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदे होतात. ते फायदे कोणते ते जाणून घेऊया ….

बद्ध कोणासन हे आसन हे खूप सोप्या पद्धतीने करू शकतो. त्याचे फायदे सुद्धा खूप आहेत . ह्या आसनाला सामान्य भाषेत तितली आसन किंवा फुलपाखरू आसन असे ही म्हणतात. हे करण्यासाठी जमिनीवर मांडी घालून बसावे लागणार. नंतर पायाची टाचे एकत्र जोडा,गुडघे वर खाली करायचे आहे. हे आसन केल्यानं स्नायू ताणतात. यामुळे स्नायू हे मजबूत होण्यास मदत होते. हे आसन कोणत्याही वयातील लोक करू शकतात. फुलपाखरांसारखे पंख म्हणजे आपल्या मांड्या या दूर करायच्या आहेत. साधारण हे आसन करताना गादीचा वापर हा केला जावा. म्हणजे आपल्या पायांना रुतणार नाही.

फायदे —

—- या अवस्थेचे बसून राहिल्याने महिलांना खूप फायदे होतात. त्यांना कोणत्याही प्रकारचे किडनीचे आजार असतील तर त्यावेळी हे आजार दूर होण्यास मदत होते.

— या अवस्थे मध्ये बसून स्त्रियांना अंडाशय आणि किडनीशी निगडित समस्यांमध्ये आराम मिळतो.

— ज्यांना अपत्य होत नाही म्हणजे वंधत्व असणाऱ्या बायकांचे त्रास देखील दूर होतात.

— मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदनेमध्ये देखील नैसर्गिकरीत्या आराम मिळतो.

— रक्ताभिसरण योग्य रीतीने होण्यास हे आसन मदत करते.

— जर जास्त प्रमाणात टेन्शन असेल तर ते दूर करण्यासाठी हे आसन लाभकारी आहे.

— गुडघ्यांचे जे काही आजार असतील तर ते दूर होण्यासाठी हे आसन लाभकारी आहे.

— अस्थमा हा आजार दूर करण्यासाठी हे आसन मदत करते.