Bhang
| |

होळीच्या भांगेचा हँगओव्हर कसा उतरवालं..?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। होळीचा सण म्हणजे रंगांची उधळण. आजच्या दिवशी लोक अगदी शत्रुत्व देखील विसरतात आणि एकमेकांना रंग लावून एकमेकांच्या रंगात मिसळून जातात. या दिवशी सगळ्यात जास्त भांग प्यायली जाते. भांग हा एक असा पदार्थ आहे ज्यामध्ये अमली अर्थात नशेची उत्पत्ती करणाऱ्या गुणधर्माचा समावेश असतो. भांगेची नशा फार वाईट हे सारेच जाणतात. पण सणाच्या दिवसांमध्ये मुद्दाम भांग पिण्याची काही अनोखीच रीत आहे.

सध्या भांग पिण्याचा जणू ट्रेंड आला आहे. पण भांग प्यायल्यामुळे डोकं गरगरू लागत. चक्कर येते. माणूस काहीबाही बोलू लागतो. अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत हा माणूस शुद्धीत नसतो. याचे कारण म्हणजे हे एक असे व्यसन आहे जे आपल्या मेंदूवरील नियंत्रण काढून घेते. ज्यामुळे हि स्टाईल अंगलट यायला वेळ लागत नाही. असे म्हणण्याचे कारण म्हणजे भांगेची नशा लवकर उतरत नाही. यामुळे शारीरिक आणि मानसिक घटकांवर परिणाम होतो. म्हणूनच आज आपण भांग चढली तर तिचा हँगओव्हर कसा उतरवायचा ते जाणून घेणार आहोत.

० भांगेचा हँगओव्हरवर असा उतरवा

  1. भांगेची नशा चढली तर तुपासारखा प्रभावी उपाय नाही. कारण भांगेची नशा उतरत नसेल तर तुपाचे सेवन फायदेशीर ठरते. त्याहीपेक्षा लवकर नशेपासून मुक्त व्हायचे असेल तर लोणी खाणे फायदेशीर ठरते.
  2. भांगेची नाश उतरवायची असेल तर आंबट गोष्टी खा. यासाठी लिंबू, संत्री अशी लिंबूवर्गीय फळे फायद्याची आहेत. अगदी दह्याचे सेवन करणे देखील लाभदायी ठरते.
  3. भांगेची नशा उतरवायची असेल तर नारळ पाणी पिणेदेखील उपयुक्त ठरते. कारण नारळ पाण्यातील खनिजे आणि इलेक्ट्रोलाईट्स शरीराला रिहायड्रेट करतात.
  4. भांगेची नशा उतरत नसेल तर आल्याचा तुकडा तोंडात ठेवून तो चघळत त्याचा रस हळूहळू घ्या. यामुळे नशा कमी होण्यास मदत होते.
  5. भांगेची नशा तुरीच्या डाळीचे पाणी प्यायल्याने देखील उतरते. त्यामुळे डाळ शिजवून त्याचे पाणी पिण्यास द्या.

० भांग प्यायल्यानंतर काय करू नये..?

  • चॉकलेट, मिठाई यासारखे गोड पदार्थ खाऊ नका. यामुळे नशा आणखी चढते.
  • भांगेसोबत दारू पिऊ नका. यामुळे शारीरिक आणि मानसिक घटकांवर परिणाम होतो.
  • भांग पिऊन वाहन चालवू नका. यामुळे अपघाताची शक्यता असते.
  • भांगेची नशा उतरविण्यासाठी कोणतेही औषध खाऊ वा पिऊ नका. यामुळे रिअॅक्शन होऊ शकते.