How to get rid of house mosquitoes

घरातील डास कसे लावू शकता पळवून ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  घरातील डास दूर करण्यासाठी घरगुती पद्धतीच्या क्लुप्त्या वापरणे खूप गरजेचे असते . घरातील डास हे दूर करणे  हे  आवश्यक असते . कारण घरातील डासांमुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. डासांमुळे आपल्या शरीराला इतर अनेक त्रास  होऊ शकतात . त्यामुळे मलेरिया किंवा डेंगू सारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे घरातील डास दूर करण्यासाठी घरगुती कोणते उपाय करू शकता ते जाणून घेऊया ….

— शरीरावर डास पळवून लावणारी क्रीम लावून घ्या, हे क्रीम डासांना आपल्यापर्यंत येऊ देणार नाही आणि डासांपासून होणाऱ्या आजारापासून आपले संरक्षण होईल.

— डासांपासून वाचवणाऱ्या द्रव्याची फवारणी करा किंवा डासांपासून बचाव करणारी उदबत्ती लावा. या मुळे घरात एकही डास येणार नाही.

— शरीरावर ट्री तेलाचे वापर करा, या मुळे शरीर डासमुक्त राहील. आणि त्यापासून होणारे आजार देखील होणार नाही. जर डासांमुळे आपल्या हाताला चावत असतील तर अश्या वेळी पुंर्णपणे अंग झाकून जाईल अशी कपडे वापरावीत. त्यामुळे डासांना चावण्याचा संबंध हा येणार नाही .

— शरीरावर नारळाचे तेल, लवंगाचे तेल, नीलगिरीचे तेल ,पुदिन्याच्या पानांचा रस, किंवा लसणाचा रस लावल्यास किंवा हे आपल्या भोवती स्प्रे केल्यावर डास त्याचा वासाने जवळ देखील येत नाही.

–दररोज  संध्याकाळी कापूर घरात जाळला जावा .

— मुलांच्या त्वचेला लोशन लावूनच झोपवावे .

—– डासांसाठी घरात निलगिरी तेलाचा वापर हा करावा.

— नेहमी झोपताना मच्छरदाणी याचा वापर केला जावा .

—- घरातील ओला सुका कचरा हा दूर करावा .

— घरातील पाण्याच्या टाक्या या नेहमी स्वच्छ करून ठेवल्या जाव्यात .

— कडुलिंबाचा पाला सुद्धा घरातील मच्छर याना दूर करू शकते .