How to Handle Angry Child

आपली मुले चिडखोर असतील तर त्यांना कसे हाताळावे

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आजकाल आपल्या आजूबाजूला अशी अनेक मुले आहेत कि, ती अगदी साध्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा चिडलेले पाहायला मिळतात. मुले चिडली जाऊ नयेत म्हणून प्रत्येक आई वडील मुलांना हव्या नको असलेल्या अनेक गोष्टी वेळेच्या आधीच दिल्या जातात. पण एका ठिकाणी करण्यात आलेल्या अभ्यासानुसार ज्या मुलांना प्रत्येक गोष्ट मागायच्या अगोदर मिळत गेली तर मात्र मुलांना कोणत्याही गोष्टीचे महत्व अजिबात राहत नाही. त्यामुळे जर मुलांना चिडखोरीपासून दूर ठेवायचे असेल तर मुलांना कश्या पद्धतीने हाताळले गेले पाहिजे हे जाणून घेऊयात. How to Handle Angry Child

मुलांना राग न येण्यासाठी प्रत्येक आपल्या पद्धतीने खूप प्रयत्न करतात . पण मुलांना राग जरी आला तरी मुलांच्या काही भावना हाताळल्या गेल्या पाहिजेत हे आई वडिलांनी समजून घेणे आवश्यक आहे. मुलांना एखाद्या गोष्टीचा राग आलेला असताना त्यांना काही सांगायला जाऊ नका. मुलांना समजवण्याची वेळ ही मुले शांत झाल्यावरची असली पाहिजे. मुले ज्यावेळी रागात असतील तर मात्र मुलांना कोणत्याही गोष्टीचे स्पष्टीकरण देण्यास किंवा मागण्यास जाऊ नये. रागात असताना मुले काहीच ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात.त्यामुळे तुम्ही शांतपणे, रागावून कसेही सांगितले तरी त्याचा फारसा उपयोग होणार नसतो.कधी त्यांनी ऐकून जरी घेतले तरी असे रागाच्या भरात ऐकलेले त्यांच्या लक्षात राहणे अवघडच आहे.म्हणून तुमच्या मुलांना राग आलेला असताना त्यांना काही सांगण्या-समजावण्या ऐवजी त्यांना शांत राहूद्या, हवे तर त्यांचे ऐकून घ्या, तात्पुरते त्यांच्या हो ला हो करा. त्यांचा राग निवळला की मात्र शांतपणे त्यांना समोर बसवून समजवा. How to Handle Angry Child

मुलांच्याकडून काही गोष्टी चुकल्या असतील तर त्यांना आपल्या चुकांची जाणीव करून देण्यास सुरुवात करा. चुका झाल्या आहेत हे त्यांना समजून सांगा . ज्याठिकाणी त्याची चूक झाली असेल त्या ठिकाणी मुलांना माफी मागण्यास सुरुवात करायला सांगा. प्रत्येक वेळेला मुलांना आई वडिलांनी आपल्या चुकांची जाणीव करून द्यावे इतकेच नव्हे तर त्यांना या गोष्टी झाल्या म्हणून तुझी इथे चूक झाली हि समजून सांगा. त्यामुळे मुलांना आपल्या चुका समजायला मदत होते.