How to handle your children to boost their confidence

मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्या मुलांना कसे हाताळावे ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या मुलांच्या भविष्यासाठी प्रत्येक आई वडील हे खूप काळजी करत असतात . मुलांना कोणत्याही गोष्टीचे कमी भासू नये , म्हणून आई वडील त्यांच्यासाठी प्रत्येक  नवीन गोष्ट  देण्याचा प्रयत्न करतात. पालक म्हणून मुलांना प्रत्येक  गोष्ट देणे   आई वडिलांसाठी  जबाबदारीचे काम आहे. आपली मुले हि कोणाशी कश्या पद्धतीने संवाद साधतात.  याची माहिती असणे गरजेचे आहे .  मुले  तापट असतील तर अश्या वेळी लहान मुलांशी संवाद  नेहमी शांततेने  साधण्याचा  प्रयन्त करावा. लहान मुले हि आपल्या मोठ्यांचे अनुकरण करत असतात. अश्या वेळी  मुलांच्या समोर कोणत्याही चुकीच्या भाषेचा वापर केला जाऊ नये. लहान वयातच मुलांच्या मनावर जेवढे परिणाम होतात. तश्या पद्धतीने मुलांची वाढ हि होत असते. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही याचा विचार करायला हवा. त्यासाठी मुलांशी नेहमी सौजन्याने वागण्याचा प्रयत्न करावा.

— मुलांवर मनापासून प्रेम करा

आमच्या मुलांवर खूप जास्त प्रेम करा. प्रत्येक आई वडिलांच आपल्या मुलांवर प्रेम असतेच पण ते व्यक्त होणे जास्त आवश्यक आहे.  मुलांच्या आरोग्यासाठी आई वडिलांनी खूप काळजी घेतली जावी . अनेक वेळा गैरसमजातून जर मुलांना त्रास जाणवत असेल तर , त्यावेळी आई वडिलांनी त्यांचे मानसिक संतुलन व्यवस्थित करणे  आवश्यक आहे . मुलांना नेहमी रागे भरू नये.

— मुलांच्या समस्यांचे वेळीच समाधान करा

अनेक वेळा आपल्या मुलांना वेगवेगळे प्रश्न पडत असतात. अश्या वेळी मुलांना त्यांच्या  प्रश्नाचे निरसन करण्याचा प्रयत्न करावा. आपली मुले आपल्या घराच्या बाहेर असताना कश्या पद्धतीने जीवन जगतात. ते आपल्या डोळ्याच्या माघारी काय काय करतात. याची माहिती घेणे सुद्धा आवश्यक आहे . आपली मुले नेहमी जर  बाहेर  असतील  किंवा   आई वडिलांपासून  दूर असतील  तर  त्यांना कोणत्या सवयी लागतील   ते  कसे माहित  होणार ? अश्या वेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही . त्यांच्या समस्या काय आहेत, ते जाणून घ्या आणि त्यापद्धतीने त्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न करा. अगदी त्यांच्या कडून चुकीची गोष्ट घडली असेल तरी सुद्धा आपण त्यांना न ओरडता. त्यांच्या बाजूने उभे राहणे आवश्यक आहे . त्यामुळे मुलांना आई वडिलांचा आधार वाटू शकतो.

इतर मुलांशी तुलना अजिबात करू नका —

अनेक वेळा आपल्या मुलांकडून काही साध्य नाही झालं तर त्याची तुलना हि इतर मुलांशी केली जाते . सतत मुलांना टोमणे दिले जातात. त्यामुळे मुलांमध्ये जास्त प्रमाणात नाकारात्मता निर्माण होते . आपल्या मुलांच्या तुलनेत इतर मुलाना घेऊ नये . अश्या वेळी आपल्या मुलांचे नैराश्य वाढत असते. अश्या वेळी मुलांची सामाजिक बांधिलकी वाढवणे गरजेचे आहे . कोणत्याही गोष्टीसाठी मुलांवर प्रेशर आणू नका. आजकाल स्पर्धेचे युग आहे . जीत हार तर राहणारच त्यामुळे मुलांवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करूया नका. काही गोष्टींसाठी मुलांना अजिबात गृहीत धरू नये . त्यांचा ज्या गोष्टींकडे कल आहे . अश्याच गोष्टींमध्ये त्यांना करियर करण्यासाठी मदत करा.

— मुलांचे कौतुक करण्यास विसरू नका

जर मुलांनी एखादी आनंदाची गोष्ट केली असेल तर अश्या वेळी  मुलांचे कौतुक करणे सोडू नका. त्यांना त्यातूनच आनंद मिळत असतो. मुलांचे कौतुक केल्याने मुलांना अजून काम करण्याचा उल्लास निर्माण होतो. अनेक वेळा आपली मुले शेफारतात. त्यामुळे मुलांचे कौतुक करण्याचे आई वडील टाळतात. पण हे चुकीचे आहे . कधीतरी त्यांचे कौतुक करणे आवश्यक असते . त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास हा वाढत असतो.

—- सकारात्मक विचार करा

मुलांना नेहमी सकारात्मक बोला . सकरात्मक विचारांचा मुलांच्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम हा होतो. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांसोबत नेहमी आनंदी राहिले पाहिजे . आई वडील हे मुलांसाठी नेहमीच आदर्श असतात. त्यामुळे नेहमी आदर्श राहण्याचा प्रयत्न करा. पालकांनी आपल्या मुलांच्या समोर नेहमी शांततेने आणि विचार करून बोलले पाहिजे .