how to identify the milk Counterfeiting

घरच्या घरी दुधाची भेसळ कशी ओळखाल ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आहारात दररोज काही ना काही प्रमाणात दुधाचा समावेश केला जातो. दुधामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स असते. ते प्रोटिन्स आरोग्यासाठी लाभकारक आहे. पण जर आपल्या आहारात असणाऱ्या दुधामध्ये जर जास्त प्रमाणात भेसळ असेल तर मात्र आपल्या शरीरासाठी अजिबात लाभकारी नाही. दूध हे पिण्यासाठी तसेच आहारात इतर पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा वापर केला जातो.

आजकाल अनेक ठिकाणी दुधाची भेसळ हि जास्त प्रमाणात वापरली जाते. भेसळयुक्त असलेले दूध हे आरोग्यासाठी फार हानिकारक आहे. कारण दुधाच्या भेसळी मध्ये काही प्रमाणात रासायनिक घटकांचा सुद्धा वापर केला जातो. आपल्या शरीरासाठी रासायनिक घटक हे फार हानिकारक असतात. दुसऱ्या प्रकारच्या भेसळीमध्ये युरिया, डिटर्जंट पावडर यासारख्या अखाद्य पदार्थांची मिलावट केली जाते. या भेसळीमुळे मात्र आरोग्यावर दूरगामी परिणाम होतात.

—– सिंथेटिक दूध ओळखण्यासाठी आधी त्याचा वास घेऊन बघा. जर त्यात काहीसा साबण किंवा डिटर्जंट सारखा वास आला तर त्यात भेसळ आहे हे ओळखावे. शुद्ध दुधाला अशा प्रकारचा वास न येता सुवास येतो.

—- शुद्ध दुधाची चव काहीशी मधुर असते, पण मिलावट असलेले दूध युरिया, डिटर्जंट किंवा स्टार्च सारखे पदार्थ वापरल्याने काहीसे कडवट असते.

—- शुद्ध दूध स्टोअर केले असता आपला रंग बदलत नाही. याउलट मिलावट असलेले दूध आधीपेक्षा पिवळट पडत जाते.

—– शुद्ध दूध उकळल्या नंतर त्याचा रंग बदलत नाही. तर भेसळ असलेले दूध उकळल्या नंतर त्याला हलकासा पिवळसर तांबूस रंग येऊ लागतो.

—- शुद्ध दूध तळहातावर घेऊन रगडले तर त्यात चिकटपणा जाणवत नाही. पण त्यात भेसळ असेल तर हाताला चिकटपणा जाणवतो.