| |

आहारात दह्याचा समावेश कसा करावा?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। दह्याचे अनेको विशेष गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. त्यामुळे भारतीय खानपान योजनेत दही आपल्या आहाराचा एक अविभाज्य भाग झाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शरीर थंड करण्यासाठी दह्यापेक्षा चांगला आणि उत्तम असा कोणताच पर्याय नाही. दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. जे आतड्यातील चांगले बॅक्टेरिया वाढवण्याचे काम करतात. शिवाय, दही वजन कमी करण्यासदेखील मदत करते. मात्र दह्याचा आपल्या आहारात नेमका कसा समावेश असावा आणि त्याचा फायदा काय होतो ते आपण माहित आहे का? जर याबाबत आपल्याला माहिती नसेल तर हा लेख नक्की पूर्ण वाचा.

० आहारात दह्याचा समावेश कसा कराल?

१) दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात १ वाटी दही खा किंवा नाश्त्यासाठी स्मूदी म्हणून वापरा.

२) एखादी भाजी, रायता किंवा फ्रुट सॅलडसाठी दह्याचा वापर करा.

३) दह्यामध्ये साखर घालून खाता येते. मात्र याचे प्रमाण कमी असावे. कारण दह्यात साखर घालून खाल्याने कॅलरीजचे प्रमाण वाढते आणि हे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

४) उन्हाळ्यात शरीर थंड आणि हायड्रेटेड राहण्यासाठी ताक पिऊ शकतात.

० आहारात दह्याचा समावेश केल्याने काय फायदा होतो?

१) निरोगी बीएमआय
– दही कॅल्शियमचा मुख्य स्त्रोत आहे आणि ते बीएमआय नियंत्रित करण्यास मदत करते. शिवाय आहारात दह्याचा समावेश केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

२) बराच वेळ पोट भरलेले राहते.
– वजन कमी करण्यासाठी दही महत्वाचे आहे. कारण दही हे कमी कार्ब्स आणि उच्च प्रथिनयुक्त अन्न आहे. जे वजन कमी करण्यासाठी मदत करते. त्यातील प्रोटीन पोटावरील चरबी कमी करते आणि स्नायू तयार करण्याचे काम करते.

३) चयापचय सुधारते.
– दह्यात प्रोबायोटिक्स असतात. जे पचन सुधारून चयापचय वाढवण्यास मदत करतात आणि यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.