How to increase platelet count fast
|

How to increase platelet count fast | डेंग्यूवर मात करण्यासाठी आजपासून जेवणात करा ‘या’ भाज्यांचा समावेश

How to increase platelet count fast |आजकाल डेंगूची साथ सर्वत्र पसरताना दिसत आहे. अनेक प्रकारचे ताप देखील येतात डेंगू झाल्यावर आपल्या रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होते. आणि हे प्लेटलेट्सचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला आपले शरीर निरोगी ठेवणे खूप गरजेचे आहे. प्लेटलेट्स देखील बॅलन्स ठेवणे खूप गरजेचे आहे.

बाजारात आजकाल अनेक औषधी मिळतात ज्यामुळे आपली प्लेटलेट्स नॉर्मल राहते. परंतु औषधांपेक्षा आपण जर काही घरगुती उपाय केले. तर यामुळे देखील आज प्लेटलेट्स आणि आपले आरोग्य अगदी नॉर्मल राहू शकते. आज आपण या लेखातून तुमच्या आहाराकडे कशाप्रकारे लक्ष द्यावे आणि कोणत्या भाज्या खाल्ल्यावरआपल्या आरोग्य नीट राहील याची माहिती पाहणार आहोत.

बीटरूट | How to increase platelet count fast

बीटरूट प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. पण जर तुम्हाला डेंग्यूची समस्या असेल तर तुम्ही बीटरूटचे सेवन करू शकता. याचे सेवन केल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. कारण त्यात अँटीऑक्सिडंट जास्त प्रमाणात असतात जे प्लेटलेट काउंट वाढवण्यास मदत करतात.

हेही वाचा- Heart Attack : तुम्ही देखील हार्ट अटॅकचे पेशंट असाल तर सावधान! आहारातील ‘या’ गोष्टी आजच बंद करा

पालक-

पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. जे निरोगी रक्त गोठण्यास आणि प्लेटलेट तयार होण्यास मदत करते. त्यामुळे जर तुम्हाला डेंग्यूचा त्रास होत असेल तर पालक भाजीचा आहारात समावेश करावा.असे केल्याने तुमचे प्लेटलेट्स झपाट्याने वाढू लागतात. यासाठी तुम्ही पालक सूप, पालकाची भाजी इत्यादींचे सेवन करू शकता.

गाजर

गाजरात व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे रक्त पेशी वाढण्यास मदत होते. त्यामुळे गाजराचा आहारात समावेश करावा. असे केल्याने डेंग्यूच्या रुग्णाला फायदा होईल.

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन के चांगल्या प्रमाणात असते. जे रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखण्यास मदत करते. अशा परिस्थितीत तुम्हालाही ताप येत असेल तर रोज ब्रोकोलीच्या भाजीचे सेवन करा.