Stay away from depression like this in Corona's time
| |

कोरोनाच्या काळात नैराश्यापासून असे राहा दूर

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन ।  कोरोनाच्या काळात जवळपास सगळेच जण नैराश्यात आले असतील किंवा बऱ्याच जणांना नैराश्याला सामोरे जावे लागले असेल, या गोष्टी साहजिकच आहेत कारण अजूनही कोरोनासाठी प्रभावी असलेली लस हि मात्र अजूनही बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे नैराश्य याचा सामना हा करावा लागतोच . अनेक जणांना या काळात आपले प्राण गमवावे लागले आहेत.. कोरोनाच्या काळात अनेक जणांना घरातूनच काम करावे लागत आहे. त्यांचा कोणत्याही बाहेरच्या व्यक्तींच्या सहवासात यायचे नाही त्यासाठी प्रचंड प्रमाणात काळजी हि घ्यावी लागते. या गोष्टींपासून जर दूर राहायचे असेल तर त्यासाठी आपल्या दररोज च्या जीवनात काय बदल केले गेले पाहिजेत याची माहिती घेऊया ….

नकारात्मक लोकांपासून दूर राहा —

अनेक लोक आजूबाजूला नकारात्मक गोष्टी बोलत असतात. त्यामुळे ज्या लोकांना हा आजार आहे. ते लोक आपोआपच नकारात्मक गोष्टींकडे वळत असतात. त्यामुळे आपल्या कामावर आपल्या आहारात याचा खूप परिणाम होतो आणि आपणही स्वतः नकारात्मक होत जातो. आपण कोरोनाच्या भविष्याबद्धल जर जास्त विचार करत असू तर त्यामुळे लोकांना जास्त प्रमाणात त्रास हा होऊ शकतो.

श्वसन कार्य —

जे लोक कोरोनच्या काळात नैराश्य याचा सामना करत आहेत त्या लोकांनी आपल्या श्वसन कार्यावर विशेष लक्ष दिले गेले पाहिजे, श्वसन कार्य हे नेहमी प्रमाणे चालत असेल तर काही हरकत नाही पण कोरोनच्या काळात नैराश्यापासून दूर राहायचे असेल तर मात्र आपल्याला आपल्या श्वसन क्रियेवर विशेष लक्ष दिले गेले पाहिजे.

लहान मुलांसोबत खेळ खेळा —

आपले दुःख किंवा आपल्या मनामध्ये असलेला ताण तणाव दूर करण्यासाठी आपण लहान मुलांसोबत हे खेळले पाहिजे. कारण त्यांचे खेळ हे फार भारी असतात. त्यामुळे आपले दुःख आपण सहजरित्या विसरू शकतो. त्यांचे हावभाव हे आपल्याया हसायला लावतात. त्यामुळे आपण तणावापासून सहजरित्या दूर राहू शकतो.

सतत व्यस्त राहा —

कोणत्या ना कोणत्या कामात जर आपण सतत व्यस्त असू तर आपल्या मनामध्ये जे काही चुकीचे किंवा नकारात्मक विचार असतात त्यांना दूर राहण्यास मदत होऊ शकते. डोक्यात कोणत्याच विचारांचे चक्र हे चालत नाही. विचार नसल्याने आपल्याला तणावांचा सामना हा करावं लागत नाही.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *