unique fashion tips for short girl
|

तुमची उंची कमी असली तरी काय फरक पडतो? अशी करा फॅशन अन दिसा स्टाईलिश

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आजकाल सगळे जग जणूं फॅशन ने बनले आहे. दिवसेंदिवस फॅशन ची वाख्या हि बदलत चालली आहे. सर्वाना आपण सुंदर दिसावे आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळा लुक हा आपलं असावा यासाठी सगळे जण प्रयत्न करतात. फॅशन च्या दुनियेत आज एक तर उद्या दुसरी अश्या वेगवेगळ्या कपड्यांची , दागिन्यांची निर्मिती हि झालेली असते.

फॅशन करायची असेल तरआपली उंची , आपली तब्बेत हि व्यवस्थित असणे आणि ती मेंटेन करणे आवश्यक आहे असे म्हंटले जाते. पण जर उंची लहान असेल तर कश्या प्रकारे आपण फॅशन करणे आवश्यक आहे . ते जाणून घेऊया….

  • ज्या मुलींची उंची कमी असतो, त्यांनी उंचीने छोटे असलेले ड्रेसेस, पँट्स, जीन्स, स्लिट्स आणि स्कर्ट्स घातले पाहिजे. जर थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही यासोबत ओपन स्ट्रेट कार्डीगन किंवा जॅकेट घालू शकता. त्याने तुमचा लुक हा इतरांपेक्षा सुंदर आणि प्रभावी वाटेल.
  • अनेकवेळा हिल्स वापरल्या गेल्या तरी चालू शकते. पाय लांब दिसावे याकरिता तुम्ही हाय वेस्ट बॉट्म्स घाला. या बॉटम्स तुम्ही टेलर्ड क्रॉप टॉप किंवा फॉर्मल शर्ट्ससोबत त्याचा वापर करा.
  •  स्कर्ट मध्ये तर कमी उंचीच्या मुली अजून उठून दिसायला सुरुवात होते. अगोदरच हाइट लहान असते. त्यामुळे स्कर्ट हा त्यांना बरोबर त्यांच्या उंचीनुसार मॅच होतो.
  • उंची लहान असलेल्या मुलींना शॉर्ट स्लीव्ह्स असलेले ड्रेस हे खूप सुदंर दिसतात.
  • साडी जर घालणार असाल तर त्यावेळी त्याच्यावर हिल्स च्या चप्पल याचा वापर करा.