| |

शरीरासाठी सात्विक आहार उत्तम असला तरी तो बनवायचा कसा..?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। एक गृहिणी आपल्या कुटुंबाच्या सर्व सुख सोयींकडे अगदी बारकाईने लक्ष देत असते. लहानांना ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ शिकवणारी हि गृहिणी नेहमीच सर्वांना उत्तम आणि पौष्टिक देण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. मात्र काय खरच त्या गृहिणीचा हा प्रयत्न दररोज यशस्वी होतो? काय शरीरासाठी लागणारा सात्विक आहार आपण घेताय? हे असे प्रश्न जर तुम्हालाही असतील. तर मैत्रिणींनो आता चिंता सोडा. जेवण करतेवेळी फक्त या गोष्टींचे पालन करा आणि आपल्या कुटुंबाला सात्विक आहार देऊन सुदृढ आणि निरोगी ठेवा.

१) कंपनविरहित अन्न तयार करणे- स्वयंपाकघरात किंवा नजीक लावलेल्या रेडिओ किंवा टी.व्ही.तून निघणाऱ्या घर्षणात्मक स्पंदनांमुळे अन्न घटकातील पोषकद्रव्यांचा र्‍हास होतो. यामुळे सत्वविरहित अन्न तयार होते जे आरोग्यास हानिकारक असते. शिवाय स्वयंपाक करतांना भांडी आदळली असता त्यातून त्रासदायक ध्वनिलहरी निर्माण होतात यामुळे चेतनेचा र्‍हास होतो.

२) स्वयंपाक घरात तणतण करणे टाळावे – स्वयंपाकघरात वावरतांना पाय आपटत चालणे किंवा अन्य अनावश्यक हालचाली करीत वैताग व्यक्त करणे वा तणतणने प्रामुख्याने टाळावे. कारण असे केल्याने भूगर्भातील त्रासदायक स्पंदने जागृत होतात आणिअन्न शिजवण्याची प्रक्रिया तमोगुणी (प्रकृति विकार) होते.

३) स्वयंपाक करतेवेळी खाणे टाळावे – अनेक स्त्रियांना स्वयंपाक बनवतेवेळी खाण्याची सवय असते. मात्र हि सवय टाळणे अत्यंत गरजेचे आहे. कारण अन्न शिजवतांना मध्येच खाल्ले तर ते अन्न सात्विकतेने शिजवण्यातील एकाग्रता अल्प होते आणि अन्नातील सत्त्वगुणी ऊर्जेला जागृती देणे अशक्य होते.

४) अन्न शिजताना अनावश्यक बडबड करणे टाळावे – अन्न शिजतेवेळी अनावश्यक बडबड केल्याने तोंडातून निघणारा दूषित वायू अन्नघटकांतील रसांची हानी करतो. यामुळे असे अन्न ग्रहण करणाऱ्यास पोटाचे विकार संभवतात. शिवाय माणूस निराशाग्रस्त बनतो; कारण या दूषित लहरींमुले मनोबलाचा र्‍हास होऊन मनुष्याची वेगवान विचारधारणा संपुष्टात येते.

५) मनात द्वेष वा क्रोध बाळगून स्वयंपाक करू नये – स्वयंपाक करताना दुसर्‍या कुणाबद्दल मनात द्वेष बाळगला तर अन्नातील सूक्ष्म सत्त्वकणांचा द्वेषाच्या तमोगुणी लहरींच्या प्रभावाने र्‍हास होतो. यामुळे अन्न खाणार्‍या व्यक्तीच्या मनातही द्वेष भावना संक्रमित होते. शिवाय क्रोधाच्या भरात अन्न शिजवले, तर क्रोधातील तेज त्रासदायक स्पंदनांच्या प्रभावाने अन्नातील पोषक द्रव्ये जाळून टाकतात .

६) अन्न शिजविण्याकरिता सौम्य अग्नीचा वापर करणे – अन्न शिजवण्यासाठी ​मंद तसेच आवश्यक तेथे मध्यम आचेचाच वापर करावा. कारण तीव्र स्वरूपी अग्नीची आच तेजतत्त्वाची दूषित स्पंदने अन्नात वेगाने सोडते. यामुळे अन्नातून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरी जळून जातात. तसेच फोडणी करताना तेल प्रमाणापेक्षा जास्त जळल्यास अन्नात कार्बन घटकाची निर्मिती झाल्याने अन्न तमोगुणी बनते.

– सनातन पब्लिकेशन व सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून