|

मनाची तयारी असेल तर घरच्या घरी सुद्धा कोरोनावर मात करू शकता

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून जगभरात कोरोनाचे संकट दाटले आहे. अनेक प्रकारे काळजी घेऊनही कोरोनाच्या रुग्णामध्ये काही प्रमाण कमी होत नाही. दिवसेंदिवस हि संख्या वाढतच चालली आहे. कोरोनावर अजूनही लस शोधण्याचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. कोरोना ची लक्षणे जरी साधारण असली तरी त्यातून मृत्यू होण्याच्या लोकांची संख्या पण जास्त आहे . अनेक लोक बरे होऊन घरी पण येत आहेत. परंतु जर आपली प्रतिकार शक्ती चांगली असेल तर आणि मनाची यॊग्य प्रकारे तयारी असेल तर आपण नक्की बरे होऊ शकता. त्यासाठी कोणते मार्ग अवलंबले गेले पाहिजेत याचा विचार करूया …

पहिल्यांदा कोरोनाला समजून घ्या —-

आपल्या मनाने आणि बुद्धीनेने असे मान्य केले की आपण आजारी आहोत तेव्हा आपल्याला आजार होणार नाही तरीही आपण मनाने आजारी होणार, कारण आपले मेंदू तेच काम करत ज्याला मनाने स्वीकार केलं जातं. मेंदू हा आपल्या शरीराचा एक भाग आहे आणि मन आपल्या सूक्ष्म शरीराचा एक भाग आहे. आपण अंगठ्याची हालचाल तेव्हाच करू शकतो जेव्हा मन आपल्या मेंदूच्या तंत्राला आज्ञा देतं. तरीही कोरोना काय प्रकार आहे साधा ताप म्हणजे कोरोना नव्हे हेही लक्षात घेतले पाहिजे.

भीती आणि काळजी —

कोणत्याही पद्धतीची भीती बाळगू नये. भीती आणि काळजीपोटी आपली रोग प्रतिकारक शक्ती बिघडून जाते. भीती बाळगून आपला आहार हा कमी
होऊ शकतो.त्यामुळे कदाचित प्रतिकार शक्ती हि कमी होऊ शकते. कोरोनाच्या काळात आपली प्रतिकारक शक्ती वाढवणे महत्त्वाचे असते. जर आपण काळजी आणि भीतीने वेढलेले असल्यास, प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीचे बूस्टर घेण्याचा देखील आपल्याला काहीच फायदा होणार नाही.

प्राणायाम आणि ध्यान —-

आपल्या मनाची शक्ती वाढविण्यासाठीचे दोनच सोपे उपाय आहे पहिले नियमानं आपण प्राणायाम आणि ध्यान केले पाहिजे. ध्यान केल्यानं आपली गमावलेली ऊर्जा पुन्हा जमा होऊ लागते आणि त्याच वेळी अतिरिक्त ऊर्जा जमा होऊ लागते जी आपल्याला सर्व प्रकाराच्या रोग आणि शोक सहन करण्यासाठी मदत करते. दररोज नित्य नियमाने व्यायाम हा केला गेला पाहिजे. त्यामुळे आपल्या शरीरात नवीन प्रकारची ऊर्जा निर्माण होऊ शकते.