How to perform pregnancy?

गर्भसंस्कार कसे केले जावेत ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । भारतीय संस्कृतीमध्ये गर्भसंस्कार याला खूप महत्व दिले जाते . गर्भसंस्कार  योग्य प्रकारे करणे हि प्रथा आहे . बाळ आईच्या पोटात असतानाच त्याच्यावर उत्तम प्रकारचे संस्कार होऊ शकतात.  असे मानले जाते . त्यामुळे बाळावर योग्य प्रकारचे संस्कार करण्याची काळजी आई बाबांबरोबर घरातील इतर व्यक्तीसुद्धा करत असतात . कशा प्रकारे संस्कार करणे आवश्यक आहे. ते जाणून घेऊया …

तुमच्या बाळाशी संवाद साधा —

अनेक वेळा बाळ ज्यावेळी आईच्या पोटात असते . त्यावेळी त्याची काही प्रमाणात हालचाल होत असते. त्यावेळी बाळाला काही सूचना देत किंवा बाळाच्या हालचालींचा वेध घेत , आईच्या पोटावर हात ठेवत बाळाशी संवाद साधू शकता. पोटात असलेले बाळ हे तुमचा संवाद ऐकत असते . असे अनेक संशोधनातून समोर आले आहे. ज्यावेळी तुम्ही बाळाशी बोलत असता त्यावेळी बाळ कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ते प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करत असते. असे संशोधनातून सिद्ध झाले आहे . तुमची प्रसूती सुखरूप होण्यासाठीदेखील काही गोष्टीचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. कारण प्रसूती काळात अशा सूचना दिल्यामुळे बाळ जन्माला येताना तुम्हाला चांगले सहकार्य करते.

ताण-तणावापासून दूर रहा —

अनेक वेळा आईला जर गरोदर पणात काही समस्यांना सामोरे जावे लागत असेल त्यावेळी मात्र बाळाची वाढ हि कमी प्रमाणात झालेली असते . त्यामुळे आईने कोणताही ताण न घेता आपले गरोदर पण एन्जॉय करायला पाहिजे . ज्या महिला या नोकरी वर असतात . त्या महिलांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते . पण त्यापूर्वी काही जबाबदारी सोडून देण्याचा प्रयत्न करा. आपण गरोदर असल्याची जाणीव सुद्धा आपल्या घरातील लोकांना करून द्या म्हणजे आपल्या जबाबदारीची आणि काळजी करण्याची जाणीव घरच्याना लक्षात येऊ शकते . तसेच ते सहकार्य करण्यास मदत करू शकतात .

मद्यपान आणि धुम्रपान करणे टाळा—

गरोदर पणात बाळाला सर्वात जास्त साथ हि आईची लागते . त्या काळात आईला आपल्या आहाराबरोबर आपल्या वागण्यात सुद्धा खुप बदल करावे लागतात . काही स्त्रिया या गरोदर असताना सुद्धा जर ध्रुम्रपान किंवा मद्यपान करत असतील तर ते बाळाच्या आणि आईच्या आरोग्यासाठी अजिबात योग्य नाही . त्याचा परिणाम हा बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो.

सात्विक आहार घ्या—

आयुर्वेदानुसार गरोदरपणात मांसाहार अथवा इतर तामसी आहार न घेणंच योग्य ठरू शकतं. त्यामुळे शक्य असल्यास या काळात सात्विक आहार घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे बाळाची वाढ हि योग्य प्रमाणात होऊ शकते .

संगीत ऐका —-

अनेक वेळा आईला संगीत हे ऐकायला खूप जास्त आवडते . संगीत ऐकल्याने मन हे शांत राहत असते . अधिक निवांतपणे जगता येते. सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्याच्या वेळी संगीत ऐकले तर आईच्या मनाला खूप छान वाटते.