|

डास चावल्यावर येणारी खाज कशी रोखाल? जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। निश्चित सांगू शकत नाही मात्र अनेक काळापासून असेच म्हटले जाते कि, आपल्या शरीरातील रक्त शोषून घेण्यासाठी डास मादी आपल्या शरीराचा चावा घेते. मात्र नर डास चावत नाही. पण विषय हा नसून विषय हा आहे कि जेव्हा डास चावतात तेव्हा आपल्या शरीरावरील त्या भागावर अतिशय खाज येते.  यामुळे खाज सहन न झाल्याने आपण खाजवतो आणि त्या ठिकाणी जखम तयार होते. पण करणार काय? ज्याला डास चावतात त्यालाच वेदना कळतात. म्हणूनच हि खाज रोखण्यासाठी आम्ही तुम्हाला काही साधे सुधे उपाय सांगणार आहोत . शिवाय हि खास का येते हे देखील सांगणार आहोत.

अ) डास चावल्यावर खाज का येते?
– डास चावताना रक्त साकळू नये म्हणून एक विशेष रसायन आपल्या शरीरात सोडतात. यामुळे डास सहजपणे रक्त शोषतात. जसे हे रसायन शरीरात शिरते आपल्याला त्या ठिकाणी खाज येऊ लागते. दम्यान या रसायनाच्या दुष्प्रभावापासून वाचण्यासाठी आपली ‘हिस्टामीन’ रोगप्रतिकारक क्षमता मदत करत असते. ती हे एक कंपाउंड उत्सर्जित करते. ज्यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशी प्रोटिन्सशी लढा देतात. या हिस्टामीन नावाच्या कंपाउंडमुळेच डास चावल्यावर आपल्याला खाज येते व त्या भागावर सूज येते.

ब) खाज रोखण्यासाठी उपाय:-

१) रबिंग अल्कोहोल – रबिंग अल्कोहोल म्हणजेच आयसोप्रोपील अल्कोहोल किंवा इथिल अल्कोहोल. डास चावल्यामूळे जर खाज येत असेल तर ह्याने ती कमी होऊ शकते. अल्कोहोलमूळे त्वचेचा दाह शमतो आणि त्वचा थंड होते. त्यामुळे खाज लगेच कमी होईल आणि इन्फेक्शनदेखील होणार नाही. उलट त्वचा कोरडी पडून सूज कमी होईल.

२) हॅण्ड सॅनिटॅयझर – हॅण्ड सॅनिटॅयझर हे रबिंग अल्कोहोल प्रमाणेच काम करते. त्यात असणाऱ्या जेलमुळे डास चावलेल्या जागी येणारी खाज थांबते व इन्फेक्शनसुद्धा होत नाही.

३) डीओडरन्ट अॅण्ड अॅन्टीपरस्पिरंट – डीओडरन्ट किंवा अॅन्टीपरस्पिरंट ह्यामुळे खाज जात नाही पण सूज आणि लालसरपणा कमी होतो.

४) साबण – साबणामुळे त्वचेची Ph लेवल संतुलित होते. यामुळे डास चावलेल्या ठिकाणी पाणी आणि साबण लावून त्याला स्वच्छ करा. खाज शांत करण्यासाठी साबणाचा वापर करणे खूप फायद्याचे ठरते. मात्र त्यासाठी एखाद्या सौम्य साबणाचाच वापर करावा.

५) केचप – केचप, मस्टर्ड, कॉकटेल सॉस, हॉट पेपर सॉस इत्यादीचा वापर तुम्ही तात्पुरता आराम मिळावा म्हणून करू शकता. कारण हे सॉस अॅसिडीक असल्यामुळे ते त्वचेला कोरडी करतात आणि यामुळे दाह शांत होतो. याशिवाय फ्रीजमध्ये ठेवलेला थंड सॉस असेल तर त्यामुळे डास चावल्यावर होणारी खाज कमी होते. याकरिता थोडासा थंड सॉस डास चावलेल्या जागी लावा आणि मग धुवून घ्या.

डास चावल्याने कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होण्यापासून टाळण्यासाठी लगेच ह्या उपायांचा वापर करा. यांच्या वापराने त्वचेवर सूज येणार नाही आणि मुळात खाज कमी होऊन त्वचेवरील लालसरपणा नाहीसा होईल. पण जर जास्त त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या.