| | |

पावसाळ्यात भिजणे रोखू शकत नसलात तरी आजारपण मात्र रोखू शकता; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या पावसाळ्याचा ऋतू सर्वांच्या मनाला प्रफुल्लित करीत आहे. पावसाळा हा मौसमच असा असतो कि प्रत्येकाला एक नवे चैतन्य आणि नवा उत्साह मिळत असतो. पण समस्या अशी आहे कि, हा ऋतू स्वतःसोबत विविध आजारदेखील घेऊन येतो. त्यात हे आजार संसर्ग असल्यामुळे त्यांना रोखणे काहीसे कठीण असते. पण कठीण समस्या सोडविणे कधीच अशक्य नसते, हे आपण सारेच जाणतो.
गतवर्षापासून संपूर्ण जगभरात कोरोना नामक विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळे याची दुसरी लाट ओसरत जरी असली तरी ज्याच्या त्याच्या मनात याविषयीची भीती अद्याप कायम आहे. त्यात पावसात भिजल्यामुळे सर्दी, खोकला व किंचित ताप असे आजार सर्व सामान्यपाने दिसून येतात. याचे गंभीर रूपांतर म्हणजे मलेरिया, कावीळ व गॅस्ट्रो एंट्राइटिस यांचा संसर्ग वाढताना दिसतो. मुख्य म्हणजे, या आजारांची लक्षणे कोरोनाच्या लक्षणांसारखीच असतात आणि त्यामुळे जनसामान्यांमध्ये याची भीती कायम आहे.

हे निश्चित मान्य आहे कि, पावसाळ्यात भिजणे किंवा न भिजणे हे काही आपल्या हातात नाही. पण आजारपण रोखणे निश्चितच आपल्या हातात आहे. आता तुम्ही म्हणाल कसे? तर याचे उत्तर आहे कि, आपल्या आरोग्याची काळजी घेणे, जीवनपद्धतीत बदल करणे, आहारात योग्य बदल. यामुळे नक्कीच कोणत्याही आजारांवर रोख लावण्यासाठी आपले शरीर सक्षम होऊ शकते.

० संसर्गजन्य आजारांची लक्षणे हि साधारण पावसाळ्यात तोंड वर काढणाऱ्या टायफाइडसारखी असतात. टायफाइड हा प्रामुख्याने दूषित पाण्यामुळे होतो. त्यामुळे जर टायफाइड झाला असेल तर आधी उलट्या होण्यास सुरुवात होते. यानंतर ताप येतो.
– पावसाळ्याच्या दिवसात टायफाइड टाळण्यासाठी पाणी गाळून आणि गरम करून प्यावे.
– आहारात कोणतेही जाड पदार्थ खाऊ नये. उदा. तेलकट, मैदायुक्त, आंबवलेले पदार्थ.

० पावसाळ्याच्या दिवसात काविळदेखील होण्याची शक्यता दाट असते. काविळदेखील फूड पॉयझन आणि दूषीत पाण्यामुळे होते. कावीळ झाल्यास ताप येतो, त्वचेला खाज येते, पोटदुखी होते आणि भूक बंद होते.
– काविळीची लक्षणे दिसत असल्यास दिवसातून दोनवेळा ताक प्यावे.
– आहारात फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करावा.
– आणि मुख्य म्हणजे त्वरित डॉक्टरांकडे तपासणी आणि सल्ल्यासाठी जावे.

० पावसाळ्यात सगळ्यात सर्वसामान्य संसर्ग कोणत्या आजाराचा होत असेल तर तो आजार आहे सर्दी आणि पडसं. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही सर्दी पडसं होऊ शकते. नाक चोंदणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि कणकण जाणवणे हि या आजाराची मुख्य लक्षणे आहेत.
– जर सर्दी पडसं झालं असेल तर अश्या रुग्णांनी आलं, काळीमिरी, लवंग आणि दालचिनीचा गरम चहा प्यावा.
– हळदीचे गरम दूध प्यावे.
– पाणी गरम करून प्यावे.
– आहारात तिखट, तेलकट आणि आंबट पदार्थ खाऊ नये.

० पावसाळ्याच्या दिवसात मलेरिया आणि हिवताप हे आजार देखील डोकं वर काढतात. मलेरिया आणि हिवताप हे साचलेल्या पाण्यामुळे तयार होणाऱ्या डासांच्या चावण्यामुळे होतात. साधारणपणे दोन ते दिवसात ताप उतरत नसेल. हातापायाचे तळवे पांढरे झाले असतील तर मलेरिया आणि हिवताप असण्याची शक्यता असते. साधारणपणे सर्दी आणि ताप मलेरियाची प्रमुख लक्षण आहेत. तसेच थंडी न वाजता गार जाणवणे, ताप न उतरणे आणि हात पाय दुखणे हि देखील लक्षणे यात आहेत.
– हि लक्षणे दिसत असतील डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक आहे.
– आहारात कोणतेही पचण्यास जड पदार्थ खाऊ नये. प्रामुख्याने पालेभाज्या आणि फळे यांचे सेवन करावे.

० आपल्या संपर्कातील एखाद्या व्यक्तीला सर्दी, खोकला झाला असेल तर त्या व्यक्तीपासून दूर राहावे.

० सर्दी, ताप आणि खोकल्यापासून बचावासाठी एसीत राहू नये. तसेच थंड पेये पिऊ नयेत. एसीमुळे अंगदुखी, थंडी भरणे, घसा दुखणे व ताप येऊ शकतो.