| |

ओमिक्रॉन व्हायरसपासून आपल्या मुलांचा बचाव कसा करालं?; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या जगभरात चर्चा आहे ती कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची. अर्थातच ओमिक्रॉनची. एकीकडे तब्बल दोन वर्ष कोरोनामुळे लोक जीव मुठीत घेऊन जगत असताना आता कुठे सर्व काही पूर्ववत होईल अशी आशा वाटत होती. दरम्यान कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु असताना जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने आपली व्याप्ती वाढवण्याच्या दिशेकडे वाटचाल केली आहे. मुख्य म्हणजे याचा सर्वात जास्त प्रभाव लहान मुलांवर होत असून याचा सर्वाधिक धोका त्यांच्या आरोग्याला असल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे सर्व पालकवर्ग चिंता व्यक्त करत आहे. अशा कठीण काळात पालक आपल्या मुलांना या व्हायरसच्या धोक्यापासून दूर कसे ठेवू शकतात याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) मुलांना ओमिक्रॉनच्या धोक्याविषयी माहिती द्या.
– सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट. मुलांना ओमिक्रॉनच्या धोक्याविषयी माहिती द्या. आताच शाळा सुरु झाल्यामुळे मुलं आनंदात आहेत. अशात ओमिक्रॉनचा धोका असल्यामुळे परत मुलांना घरापुरतेच बंदिस्त राहावे लागू शकते. त्यामुळे मुलांना मानसिकदृष्ट्या तयार करा. ज्यामुळे ते तणावाखाली जाणार नाहीत.

 

२) मुलांना समजाविण्यासाठी कोविड नियमावलीचे स्वतः पालन करा.
– वेळोवेळी मुलांना कोविडचे नियम पाळायला सांगताना आधी स्वतः त्यांचे पालन करा. कारण लहान मुलांची आकलन क्षमता मजबूत असते. आपण जे वागतो मुलं तेच हुबेहूब करतात. म्हणून मुलांना नियमांचे पालन करणे शिकवायचे असेल तर आधी घरातील मोठ्यांनी नियमावली पाळा.

 

३) मुलांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या.
– आजकाल सर्वच लहान मुलांकडे सायकल, स्कूटरपासून ते अनेक इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स असतात. तर मुलांना या खेळण्यांसह घरीच खेळण्याचा सल्ला द्या. जर बिल्डिंग वा कॉलनीतील मुलांसोबत खेळणार असतील तर त्यांना त्यांना बाहेर फुटबॉल, चेंडू वा सॉफ्ट टाईज घेण्यास सांगा. यानंतर महत्वाचे म्हणजे मूल खेळून परतल्यानंतर त्यांची खेळणी अँटी-सेप्टिक द्याव्याने धुवा आणि मुलांनाही व्यवस्थित अंघोळ घाला.

 

४) मुलांना बाहेरचे अन्न पदार्थ खायला देऊ नका.
– मुलांना बाहेरचे पदार्थ खायला देणे प्रामुख्याने टाळा. याऐवजी मुलांना घरातल्या घरात त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून खायला द्या. यामुळे मुलं बाहेर जाऊन खाण्याची इच्छा प्रकट करणार नाहीत वा किमान त्यांची बाहेर खाण्याची इच्छा कमी होईल.

 

५) मुलांना शारीरिक अंतराचे महत्व समजावून सांगा.
– आपल्या मुलांना शारीरिक अंतर किती महत्वाचे आहे याची समज द्या. यामुळे मुले खेळतानासुद्धा अगदी आपली आवडती व्यक्ती का असेना अंतर ठेवतील. मुले घराबाहेर पडताना त्यांना वारंवार या गोष्टीची आठवण करून द्या की जर तुम्हाला मित्र आणि कुटुंबासोबत रहायचे असेल तर इतर व्यक्तींपासून अंतर ठेवणे गरजेचे आहे. पण असे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा कि, मुलांना टोमणे मारून वा दबावाखाली आणून हे करू नका. असे केल्यास मुलं नाराज होतील आणि दुरावतील.