हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या शरीरात पांढऱ्या रक्त पेशी, लाल रक्तपेशी आणि प्लेटलेट्स अशा तीन प्रकारच्या पेशी असतात. थ्रोम्बोसाइटोपेनिया ही एक अशी शारीरिक अवस्था आहे. ज्यामध्ये शरीरातील पेशी अचानक कमी होतात. शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्लेटलेट्स जरुरी असतात. रूग्णाला एखादी जखम झाल्यास त्या जागी रक्त न गोठल्यास अती रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. म्हणूनच शरीरात सर्व रक्तपेशीची संख्या नियंत्रणात असायला हवी. काही कारणांमुळे अचानक जर या पेशी कमी झाल्या तर त्या वाढवण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात.
बहुतेकदा डेंग्यू वा कोणत्याही गंभीर तापात शरीरातील रक्त पेशी झपाट्याने कमी होतात. याचे निदान करण्यासाठी कम्प्लिट ब्लड काऊंट ही रक्तचाचणी केली जाते. ज्यामुळे शरीरातील पेशी मोजता येतात. साधारणपणे माणसाच्या शरीरात दीड लाख ते साडे चार लाख मात्र काही गंभीर परिस्थितीमध्ये त्यांची संख्या दहा ते वीस हजारावर पोहतचे. अश्या स्थितीत व्यक्तीच्या जीवाला धोका असतो. यामुळे वेळीच उपचार करून पेशी वाचविणे गरजेचे असते. पण त्यासाठी आपल्याला शरीरात पेशी कमी झाल्या आहेत समजणे जरुरी असते. यासाठी आज आम्ही तुम्हाला शरीरातील पेशी कमी झाल्याची लक्षणे सांगणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
१) त्वचेवर लहान लालसर चट्टे येणे – शरीरात पेशी कमी झाल्यास त्वचेवर लालसर रंगाचे छोटे छोटे चट्टे वा डाग येतात. आपल्या शरीरात रक्तप्रवाह अनियंत्रित झाल्यास ही समस्या निर्माण होते.
२) सांधेदुखी – कंबर, पायाचा गुडघा आणि टाचांच्या सांध्यामध्ये असह्य वेदना आणि दाह जाणवल्यास पेशी कमी झाल्या असण्याची शक्यता असते. कारण, रक्ताभिसरण अनियंत्रित झाल्यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो. शिवाय बोनमॅरो च्या त्रासामुळेही हि समस्या जाणवते.
३) जखम होणे – शरीरातील पेशी कमी झाल्यास सहज जखमा होतात. जखम होणे, जखम चिघळणे वा लवकर बरी न होणे हि लक्षणे प्रामुख्याने शरीरात प्लेटलेट्स कमी झाल्याची आहेत. कारण एखादी जखम झाल्यावर अती रक्तस्त्राव होऊ नये यासाठी रक्तातील प्लेटलेट्स रक्त गोठवतात. ज्यामुळे रक्तप्रवाह थांबतो आणि जखम नैसर्गिकरित्या भरून निघते. पण जर प्लेटलेट्स कमी असतील तर जखम लवकर बरी होत नाही.
४) अती रक्तस्त्राव – शरीरात प्लेटलेट्स कमी असतील तर संबंधित व्यक्तीला झालेली एखादी छोटीशी जखमदेखील गंभीर स्वरूप धारण करते. अगदी लहानसं खरचटलं वा कापलं तरी रक्तप्रवाह न थांबल्यामुळे अशक्तपणा येतो.
५) नाकातून सतत रक्त वाहणे – पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स या आपल्या शरीरातील क्रिया व्यवस्थित राहण्यासाठी प्रमुख घटक आहेत. त्यामुळे जर अचानक प्लेटलेट्स कमी झाल्या तर आरोग्यावर याचा वाईट परिणाम होतो. ज्यामुळे संबंधित व्यक्तीला सतत नाकातून रक्त येण्याचा त्रास जाणवतो.
६) लघवी वा विष्ठेवाटे रक्त जाणे – रक्त गोठण्याच्या क्रियेत आणि रक्तदाब नियंत्रणावर परिणाम झाल्यास रूग्णाला लघवी आणि विष्ठेवाटे रक्त पडण्याचा त्रास जाणवतो.
० त्यामुळे वरील पैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.