The health effects of too much sleep

आरोग्यासाठी कश्या पद्धतीने झोपले पाहिजे ?

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन ।  आपल्या आरोग्यासाठी आपल्याला योग्य प्रकारची झोप मिळणे हे जास्त गरजेचे आहे. झोप जर झाली नाही तर मात्र चिडचिड होण्यास सुरुवात होते. झोपेच्या समस्या जर जास्त प्रमाणात जाणवायला लागल्या तर त्यामुळे कदाचित छोट्या मोठ्या आजाराला नेहमी सामोरे जायला लागू शकते. जर कोणाला झोप चांगली लागत नसेल तर पुढचा दिवस हा सगळा आळसाने भरलेला जातो. कोणतेच काम योग्य आणि वेळेत होत नाही त्यामुळे चिडचिड निर्माण होऊ शकते.

एका सर्वेक्षणात झोपेबद्धलच्या काही गोष्ट समोर आल्या आहेत. आपले आरोग्य हे फक्त पुरेशी झोप आणि योग्य आहार या गोष्टींवर अवलंबून नसते. आपल्या झोपण्याची पद्धत कशी आहे. यावर आपली झोप अवलंबून असते. त्यावर आपले आरोग्य हे अवलंबून राहते. याशिवाय आपल्या झोपेच्या पद्धतीचा तुमच्या शरीरावरही वाईट परिणाम होतो का ? तर कधी कधी आपल्या चुकीच्या झोपेचा सुद्धा आपल्या शरीरावर वाईट परिणाम हा होऊ शकतो. जर आपल्याला चांगली झोप आणि आरोग्य हवे असेल तर आपण आपल्या पाठीवर झोपावे. या अवस्थेत, डोके, हात, पाय आणि मणक्याचे हाडे नैसर्गिक स्थितीत राहतात. ज्यामुळे चेहर्यावर आणि त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत. तथापि, यास्थितीत झोपल्याने स्नॉरिंग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि तणाव वाढण्याची शक्यता वाढते.

झोपण्याच्या पद्धतीमध्ये कधी सुद्धा तुम्ही तुमच्या पोटावर झोपू नये. त्यामुळे तुमचे आरोग्य हे अजून बिघडू शकते. आणि तुम्हाला इतर हि त्रास जास्त निर्माण होऊ शकतात. झोपेसाठी स्टार फिश पद्धतदेखील चांगली मानली जाते. यामध्ये, आपण आपल्या पाठीवर झोपी जाऊन आपले दोन्ही पाय पसरता आणि दोन्ही हात आपल्या डोक्याजवळ कोपर ठेवून झोपा. झोपेसाठीदेखील ही पद्धत उत्कृष्ट मानली गेली आहे. कधी कधी उजव्या आणि डाव्या कुशीवर झोपणे सुद्धा आवश्यक असते. पोटावर जर तुम्ही झोपलात तर मात्र तुम्हाला पाठीच्या मानेच्या समस्या या जास्त प्रमाणात जाणवू शकतात. आपल्या आरोग्यासाठी कमीत कमी ६ तास आणि जास्तीत जास्त ९ तास झोपणे अपेक्षित आहे.