samll child

होळीच्या दिवशी लहान मुलाची कशी घ्याल काळजी

हॅलो आरोग्य ऑनलाईन । होळी हा सण आनंदाचा असतो. त्या दिवशी सगळ्या ठिकाणी रंगांची उधळण केली जाते. त्यावेळी मात्र नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले रंग वापरले गेले पाहिजेत. रासायनिक रंगांमुळे चेहऱ्यावर परिणाम होऊ शकतो. त्या दिवशी मुलांची काळजी घेणे आवश्यक असते. लहान मुलाना होळी खेळायला खूप आवडते. होळी खेळताना मुले हि अतिशय उत्साही असतात. या उत्साहात मुलं असे काही करतात मुळे त्यांना त्रास होतो. मुलं होळी खेळताना या गोष्टीची काळजी घ्यावी.

— मुलांना जास्त वेळ घरा बाहेर पाठवू नका. मुलांना एकटे बाहेर खेळायला पाठवू नका. अनोळखी माणसांसह होळी खेळू देऊ नका. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या मुळे मुलांना बाहेर खेळायला पाठवू नका.

— थोड्या वेळासाठी पाठवणार असाल तर त्यावेळी मात्र मुलांना मास्क घालूनच खाली पाठवले जावे.

— पाण्याने होळी खेळू देऊ नका. मुलांना पाण्याने होळी खेळणे आवडते ,परंतु मुलांना पाण्याने होळी खेळण्याऐवजी कोरड्या रंगाने होळी खेळायला सांगा .

— सेफ्टी ऍक्सेसरीज घालून पाठवा.  मुलांना सुरक्षेच्या दृष्टीने डोक्यावर कॅप आणि चष्मा लावून पाठवा जेणे करून रंग त्यांच्या डोळ्यात जाणार नाही. त्यांना पूर्ण बाह्यांचा शर्ट घालून पाठवा जेणे करून रासायनिक रंगाचा त्यांच्या त्वचेवर काही परिणाम होणार नाही.

— लहान मुलांच्यात रंगावरून किंवा पाण्यावरून भांडणे होऊ शकतात. काहींना रंग खेळणे आवडत नाही , पण चुकून जर रंग हा त्याच्या अंगावर गेला तर तो भांडू लागतो. त्यावेळी मात्र मुलांना अशा लोकांपासून किंवा मुलांपासून दूर ठेवणे गरजचे असते. त्यांना समजावून सांगा.

— मुलांनी एकदा खेळायला सुरुवात केली तर त्यावेळी त्यांना खाण्या – पिण्याचे भान हे अजिबात राहत नाही. त्यावेळी मात्र मुलांकडे त्याच्या खाण्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. बाहेर खूप ऊन असते . त्यामुळे त्यांना ठराविक वेळेनंतर पाणी दिले गेले पाहिजे . खाण्याकडे दुर्लक्ष झाल्यासं मुलांचे पोट हे बिघडू शकते.