How to take care of eyes in Holi?

होळीमध्ये डोळ्यांची काळजी कशी घ्याल ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  नेहमी प्रमाणे यावर्षी हि होळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा करण्याची तयारी सुरू आहे . होळी हा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे . होळीच्या दिवसांमध्ये खूप जास्त धमाल केली जाते . वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांचा वापर हा केला जातो. पूर्वीच्या काळात नैसर्गिक प्रकारच्या रंगाचा वापर हा जास्त प्रमाणत केला जात होता. त्यामुळे कोणत्याही प्रकारची ऍलर्जी किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास हा होत आपल्याला नव्हता. आजकल रासायनिक पदार्थांचा वापर हा रंगात करत असल्याने त्याचा त्रास हा डोळ्यांसोबत आपल्या त्वचेला सुद्धा होऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या बाजारात आल्या आहेत . त्या पिचकाऱ्यांचा वापर हा करत असाल तर जपून वापरणे गरजेचे आहे . होळीच्या काळात डोळ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे . कसे ते जाणून घेऊया ….

—- आपण रंगपंचमी च्या दिवशी किंवा धुळवड च्या दिवशी रंग खेळला जातो. त्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाचा वापर हा जास्त केला जातो. त्यावेळी रंग निघून जाण्यासाठी किंवा डोळ्याला त्रास न होण्यासाठी डोळ्याच्या खालच्या बाजूला काही प्रमाणात कोल्ड क्रीम चा थर लावा. ज्यावेळी क्रीम हि पूर्ण सुकली जाईल आणि त्याच्यानंतर तुम्ही पाण्याच्या साहयाने ते धुवून काढत असला तर तो रंग हा लगेच निघाला जातो.

— तुम्ही जर रंगपंचमीच्या दिवशी कार च्या मदतीने इकडे तिकडे जात असाल तर त्यावेळी मात्र आपल्या कारच्या खिडक्या लावणे गरजेचे आहे . जर चुकून कोणी फुगा किंवा रंग टाकत असेल तर त्यावेळी आपल्या डोळ्यांत रंग हा जाऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांना इजा होते .

—- जर कोणी रासायनिक रंगाचा वापर करत असेल तर त्यावेळी त्याला ते रंग वापरू नका असे सांगा .

— अनाहुताने जर चुकून एखादा रंग हा डोळ्यात गेला तर त्यावेळी मात्र डोळ्यांची आग आग होऊ शकते. अशा वेळी नेहमी गॉगल किंवाचष्मा वापरण्याचा प्रयत्न करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *